हातात फोटो…डोळ्यात अश्रू…मनात दुःख.. लष्करी गणवेशात कर्नल पत्नीचा पायलट पतीला अखरेचा निरोप

हातात फोटो…डोळ्यात अश्रू…मनात दुःख.. लष्करी गणवेशात कर्नल पत्नीचा पायलट पतीला अखरेचा निरोप

केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात 15 जून रोजी जयपूरचे राजवीर सिंह यांचे निधन झाले. जयपूरमधील चांदपोल मोक्षधाम येथून त्यांची अंतिम यात्रा मंगळवारी काढण्यात आली. त्यांना अखेरचा निरोप देताना प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान यांनी दुःख मागे सारत पतीला अंतिम निरोप दिला. यावेळी दीपिका यांच्या हातात पतीचा फोटो होता. हातात फोटो…डोळ्यात अश्रू…मनात दुःख.. लष्करी गणवेशात कर्नल पत्नी दीपिका यांनी पायलट पतीला अखरेचा निरोप दिला. दीपिका चौहान यांनी लष्करी परंपरेनुसार तिच्या पतीला अंतिम अभिवादन केले. त्यांच्या या कृतीने वातावरण स्तब्ध झाले होते. ती लष्कराच्या गणवेशात पतीचा फोटो धरून चालत होती पण तिच्या चेहऱ्यावर पत्नीचे दुःख दिसत होते.

केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात राजवीर सिंह यांचे निधन झाले. जयपूरमधील चांदपोल मोक्षधाम येथून आज त्यांची अंतिम यात्रा काढण्यात आली. लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान यांनी एका सैनिकाप्रमाणे आपल्या पतीला अंतिम निरोप दिला. राजवीर यांना निरोप देताना दीपिका यांचे मौन हृदयद्रावक होते. तर त्यांच्या आईने ‘राजवीर अमर रहे’च्या अशा घोषणा देत वातावरण भावनिक केले.

राजवीर सिंह चौहान लेफ्टनंट कर्नल म्हणून सैन्यातून निवृत्त झाले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आर्यन एव्हिएशन या खाजगी हेलिकॉप्टर सेवा कंपनीत पायलट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांना 6 महिन्यांपूर्वी जुळी मुले झाली. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 15 जून रोजी केदारनाथहून गुप्तकाशीला परतणारे हेलिकॉप्टर घनदाट जंगलात आणि दुर्गम भागात कोसळले. या अपघातात पायलट राजवीरसह इतर 6 जणांचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;