बंगलो प्लाटवर उत्तुंग इमारतीला तूर्त परवानगी नाही, हायकोर्टाचा सिडकोला दणका

बंगलो प्लाटवर उत्तुंग इमारतीला तूर्त परवानगी नाही, हायकोर्टाचा सिडकोला दणका

खारघर येथील 15 बंगलो प्लाटवर तूर्त उत्तुंग इमारती बांधण्यास परवानगी देऊ नका, असे अंतरिम आदेश देत उच्च न्यायालयाने सिडकोला चांगलाच दणका दिला आहे.

न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. सिडकोने योग्य प्रकारे नियोजन करायला हवे. बंगलोसाठी आरक्षित असलेल्या प्लाटवर उंच इमारतींना परवानगी देणे व्यवहार्य नाही, हा याचिकाकर्त्याने मांडलेला मुद्दा योग्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. पुढील सुनावणीपर्यंत सिडकोने यासंदर्भात कोणतीही मंजुरी देऊ नये. याचे प्रतिज्ञापत्र दाखल केल्यास त्याची प्रत याचिकाकर्त्याला द्यावी, असे आदेश सिडकोला देत खंडपीठाने ही सुनावणी 25 जूनपर्यंत तहकूब केली.

काय आहे प्रकरण?  

मंदार जाधवसह 17 जणांनी अॅड दीनदयाळ धनुरे यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. 2003 व 2011 मध्ये सिडकोने बंगलो प्लाटचा लिलाव केला. या शेजारील भूखंड छोटय़ा बंगलोसाठी राखीव असतील, असेही सिडकोने सांगितले होते. या अटीचा भंग करत येथील बंगलो प्लाटवर उत्तुंग इमारतींना परवानगी दिली आहे. ही परवानगी रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

नवीन नियोजन अशक्य

सिडकोने बंगलोचा विचार करून नियोजन केले होते. रस्ते व मलनिस्सारण व्यवस्था करण्यात आली आहे. येथे उत्तुंग इमारतींना परवानगी दिल्यास पायाभूत सुविधा देण्यात अडचणी येतील, असा मुद्दा अॅड. धनुरे यांनी उपस्थित केला. तो न्यायालयाने ग्राह्य धरला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;