Kitchen Cleaning Tips- किचन चकाचक ठेवण्यासाठी या वस्तू तुमच्या घरी असायलाच हव्यात

Kitchen Cleaning Tips- किचन चकाचक ठेवण्यासाठी या वस्तू तुमच्या घरी असायलाच हव्यात

 

स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणं ही खरंतर एक कसरत असते. किचनमध्ये दिवसभर उभं राहून स्वयंपाक करणं. त्यानंतर किचनची स्वच्छता करणं हे जिकीरीचं काम आहे. आपल्या प्रत्येकाला स्वयंपाकघर चकचकीत आणि स्वच्छ दिसावे असे वाटत असते. त्याकरता आपण विविध उपाय करतो. परंतु अगदी साध्या सोप्या वस्तू आणि पदार्थांच्या माध्यमातूनही आपले किचन चकाचक होईल.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा स्वच्छतेसाठी सर्वात जास्त वापरला जातो आणि तो खूप प्रभावी देखील आहे. तुम्हाला स्वयंपाकघरातील बेसिन एरिया स्वच्छ करायचा असेल, तर बेकिंग सोड्यात लिंबाचा रस मिसळा आणि पेस्ट बनवा आणि बेसिन स्वच्छ करा. या उपायाने तुमचे स्वयंपाकघरातील बेसिन पूर्वीपेक्षा जास्त चमकू लागेल.

Kitchen Cleaning Tips: जळलेली स्टीलची भांडी स्वच्छ करण्यासाठी आता फक्त 5 रुपये खर्च करा, वाचा सविस्तर

 

व्हिनेगर

नळ किंवा स्वयंपाकघरातील इतर भाग स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर हा सर्वोत्तम उपाय आहे. व्हिनेगर सर्व प्रकारचे डाग सहजपणे काढून टाकते. यासाठी एका भांड्यात व्हिनेगर आणि पाणी घालून द्रावण तयार करा आणि स्क्रबच्या मदतीने ते स्वच्छ करा.

लिंबू

नळावरील घाण आणि डाग काढून टाकण्यासाठी लिंबाचा रस हा सर्वोत्तम उपाय आहे. लिंबाचा वापर करून, कोणतीही घाण सहजपणे साफ करू शकाल दुर्गंधी देखील दूर करु शकाल. लिंबाच्या रसात मीठ मिसळून नळ 10 मिनिटे घासून घ्या आणि नंतर धुवा.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;