अहमदाबाद विमान अपघातानंतर मंदिरा बेदीला बसला धक्का! उचलावे लागले हे मोठे पाऊल

अहमदाबाद विमान अपघातानंतर मंदिरा बेदीला बसला धक्का! उचलावे लागले हे मोठे पाऊल

अहमदाबाद विमान अपघाताची बातमी येताच संपूर्ण देश हादरून गेला. 12 जून रोजी या अपघातात 241 विमानातील प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. अलिकडेच अभिनेत्री मंदिरा बेदीनेही या प्रकरणावर उघडपणे भाष्य केले आहे. तिने सांगितले की, या अपघाताच्या बातमीने ती आतून पूर्णपणे कोलमडून गेली होती.

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाच्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेचा अनेक लोकांवर खूप वाईट परिणाम झाला आहे. यामध्ये अभिनेत्री मंदिरा बेदीचे नावही समाविष्ट आहे. अलीकडेच तिने या घटनेच्या परिणामाबद्दल भाष्य केले आहे. तिने सांगितले की तिला या घटनेने खूप धक्का बसला. यातून बाहेर पडण्यासाठी तिला चक्क एक महत्त्वाचे पाऊल उचलावे लागले. अनेक मोठ्या स्टार्सनीही या घटनेवर पोस्ट शेअर करून शोक व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

अलीकडेच, मंदिराने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात तिने सांगितले की, या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी तिला एका समुपदेशकाची मदत घ्यावी लागली. अभिनेत्रीने सांगितले की, ही घटना काही केल्या तिच्या डोक्यातून जात नव्हती. तिला या घटनेमुळे मानसिक त्रास झाल्यामुळे तिच्या कामावर आणि रोजच्या जगण्यावर परीणाम होत होता. म्हणूनच तिने स्वतःला सावरत समुपदेशकाची भेट घेण्याचे ठरवले.

मंदीराने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला. ती म्हणाली, अहमदाबाद विमान अपघातापासून माझ्या छातीवर सतत ओझे आहे. ती पुढे म्हणाली की मी ठरवले आहे की मी एकटीने याचा सामना करणार नाही आणि समुपदेशकाशी बोलेन. तुम्हालाही दुःख, चिंता किंवा तणाव वाटत असेल तर समजून घ्या की, तुम्ही एकटे नाही आहात!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;