चौथ्या दिवसापर्यंत 119 मृतांची ओळख पटली

चौथ्या दिवसापर्यंत 119 मृतांची ओळख पटली

एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी झालेल्या 270 जणांपैकी 119 जणांची ओळख पटवण्यात यश आले आहे. मृत व्यक्ती व कुटुंबीयांच्या डीएनए नमुन्यांची जुळवाजुळव करुन मृतदेहांची ओळख पटवली जात आहे. सोमवारी चौथ्या दिवसाअखेर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींसह 76 जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मंगळवार सायंकाळी किंवा बुधवारी सकाळपर्यंत सर्व मृतांची ओळख पटवली जाईल, असा अंदाज एका पोलीस अधिकाऱयाने व्यक्त केला. दरम्यान, विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजच्या अतुल्यम वसतिगृहातील तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. आतापर्यंत वसतिगृहातील एकूण आठ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे.

विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर सोमवारी राजकोट येथे पूर्ण राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. घरापासून अंत्यसंस्कार स्थळापर्यंत सहा किलोमीटर अंतरावर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पुष्पहार अर्पण करून विजय रुपाणी यांना श्रद्धांजली वाहिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;