मुरबाडमध्ये भाजपचे दहा नगरसेवक फुटले, भाजपने देशात जे पेरले तेच ठाण्यात उगवले; नगरपंचायतीत बंडाचा झेंडा, सत्ता संपुष्टात

मुरबाडमध्ये भाजपचे दहा नगरसेवक फुटले, भाजपने देशात जे पेरले तेच ठाण्यात उगवले; नगरपंचायतीत बंडाचा झेंडा, सत्ता संपुष्टात

भाजपने जे अख्ख्या देशात पेरले ते पहिल्यांदाच मुरबाडमध्ये उगवले. भाजप आमदार किसन कथोरे आणि अन्य नेत्यांच्या मनमानीला कंटाळून मुरबाड नगरपंचायतीमधील भाजपचे दहा नगरसेवक फुटले. या नगरसेवकांनी बंडाचा झेंडा उभारत मुरबाड परिवर्तन पॅनल हा वेगळा गट स्थापन केला. या स्वतंत्र गटासाठी त्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यता मागितली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आज या स्वतंत्र गटाला मान्यताही दिली. मुरबाड नगरपंचायतीत भाजपचे १२ नगरसेवक होते. त्यापैकी दहा नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे आता अवघे दोन नगरसेवक उरले असून नगरपंचायतीतील या राजकीय उलथापालथीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुरबाड नगरपंचायतीत भाजपचे 12 नगरसेवक निवडून आले आहेत. त्याचबरोबर दोन स्वीकृत नगरसेवकही आहेत. त्यामुळे 17 सदस्य संख्या असलेल्या नगरपंचायतीवर भाजपची सत्ता आहे. गेल्या काही महिन्यांपासून आमदार किसन कथोरे नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक देतात. त्यांची कोंडी करतात, असा संताप भाजपच्या नगरसेवकांमधून उघडपणे व्यक्त केला जात होता. या नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे केली जात नसल्याचा आरोपही त्यांच्याकडून होत होता. केवळ ठरावीक प्रभागातच कथोरे कोट्यवधींचा निधी ओततात, पण आमच्यावर अन्याय करतात. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही कथोरे यांनी पक्षाबाहेरील उमेदवार आमच्यावर लादला, अशी संतापाची खदखद भाजपच्या नगरसेवकांमधून व्यक्त होत होती. भाजपच्या 12 नगरसेवकांपैकी 10 नगरसेवक फुटल्यामुळे या नगरपंचायतीमध्ये असलेली भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब
भाजप नगरसेवकांच्या संतापाचा अखेर स्फोट झाला आणि माजी नगराध्यक्ष, नगरसेवक रामभाऊ दुधाळे, गटनेते मोहन गडगे, उपनगराध्यक्षा दीक्षिता वारे-वारघडे, ऊर्मिला ठाकरे, नम्रता जाधव, अनिता मार्के, रविना अधिकारी, सुजित ठाकरे, नंदकुमार जाधव, विनायक अधिकारी यांनी भाजपला रामराम ठोकला. भाजपमधून बाहेर पडलेल्या या सर्वच नगरसेवकांनी ‘मुरबाड परिवर्तन पॅनल’ हा वेगळा गट स्थापन केला आहे. या वेगळ्या गटाला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने आजच मान्यता दिली. या मान्यतेचे पत्र मुरबाड नगरपंचायतीला मिळाले आहे. इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक बाहेर पडल्याने भाजप पक्षाला आणि आमदार किसन कथोरे यांना मोठा धक्का बसला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माखजन करजुवे मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत माखजन करजुवे मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत
संगमेश्वर तालुक्यातील माखजन करजुवे या मुख्य रहदारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळली असून हा मार्ग अतिशय धोकादायक बनलेला आहे. शैक्षणिक...
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचे सरकारचे आदेश
धीरुभाईंच्या मागे कधी ईडी लागली नाही किंवा त्यांच्या कारखान्यावर जप्ती आली नव्हती; संजय राऊत यांचा भाजपसोबत गेलेल्यांना टोला
मुंबई गिळण्यासाठीच अमित शहा यांनी निवडणूक आयोगावर दबाव टाकत मिंधे गट बनवला – संजय राऊत
नाशिकमधील शिवसेना खंबीर, मजबूत आणि अभेद्य; संजय राऊत यांनी केलं स्पष्ट
युद्धग्रस्त इराणमधून निघालेले 110 हिंदुस्थानी आर्मेनिया सीमेवर दाखल
इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावरील हल्ल्यानंतर, अँकर सहर इमामी बुलेटिन देण्यासाठी परतली! इस्त्रायलला सुनावले खडे बोल