Rain Update – राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट

Rain Update – राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट

मागील जवळपास 15 दिवस उसंत घेतलेल्या मान्सूनचा महाराष्ट्रातील जोर वाढला आहे. शनिवारी सायंकाळपासून राज्याच्या बहुतांश भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून हवामान खात्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील 48 तास गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर शेजारच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवून हवामान खात्याने या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे जाहीर करतानाच विविध जिल्ह्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस अर्थात 18 जूनपर्यंत कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. या कालावधीत वादळी वारे वाहणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 60 किलोमीटर राहणार आहे. त्यामुळे समुद्र किनारपट्टी लगतच्या रहिवाशांना तसेच मच्छीमारांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना हवामान खाते, पालिका प्रशासन आणि आपत्कालीन विभागाने दिल्या आहेत.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिवृष्टी होणार असल्याचे हवामान खात्याच्या पत्रकात म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करून रहिवाशांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;