मृत्युचं तांडव! गावकऱ्यांना घराबाहेर काढून अंदाधुंद गोळीबार; घरात लपलेल्यांना जिवंत जाळलं, 100 ठार, शेकडो जखमी

मृत्युचं तांडव! गावकऱ्यांना घराबाहेर काढून अंदाधुंद गोळीबार; घरात लपलेल्यांना जिवंत जाळलं, 100 ठार, शेकडो जखमी

पहाटेच्या सुमारास लोक साखरझोपेत असताना अचानक गावामध्ये बंदुकधारी घुसले. गावकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांना घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर रांगेत उभे करून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. एवढेच नाही तर जे लोक घरात लपले होते त्यांना ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत जाळण्यात आले. यात 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून शेकडो जखमी झाले आहेत. क्रूरतेचा कळस गाठणारा हा भयंकर प्रकार नायजेरियातील येलेवाटा गावामध्ये घडला आहे.

अ‍ॅमनेस्टी इंडरनॅशनल नायजेरियाने दिलेल्या माहितीनुसार, बेनुए राज्यातील येलेवाटा गावामध्ये शुक्रवार मध्यरात्री आणि शनिवारच्या पहाटे काही बंदुकधारी घुसले. त्यांनी अंदाधुंद गोळीबार करत 100 हून अधिक नागरिकांचा जीव घेतला. अनेक जण अद्यापही बेपत्ता असून शेकडो जखमी झाले आहे. जखमींपर्यंत आवश्यक वैद्यकीय मदतही पोहोचू शकलेले नाही. बंदुकधाऱ्यांनी अनेक कुटुंबांना घरात बंद करून जिवंत जाळले.

बेनुए राज्यात हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बंदुकधाऱ्यांना कायद्याची भीतीच राहिली नाही. हे बंदुकधारी गावागावामध्ये जाऊन अंदाधुंळ गोळीबार करत आहेत. यामुळे या भागातील नागरीक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत. या हल्ल्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी मारले जात असून त्यांच्या स्थलांतरामुळे अन्नधान्याची टंचाई होण्याची शक्यता आहे.

बेनुए हे राज्य नायजेरियातील मध्यवर्ती भागात आहे. उत्तरेकडील मुस्लिम बहुल भाग आणि दक्षिणेकडील ख्रिश्चन बहुल भागांचा हा संगम स्थळ असून येथील जमिनीवर भूमाफियांचा डोळा आहे. या भागामध्ये गुरेढोरे चारणारे आणि शेतकरी यांच्यात जमिनीवरून मोठा संघर्ष सुरू असतो. याला जातीय आणि धार्मिक किनारही असून ते एकमेकांना ठार करत असतात.

गेल्या महिन्यामध्ये बेनुए राज्यातील ग्वेर वेस्ट जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात 42 जणांचा मृत्यू झाला होता. एसबीएफ इंटेलिजन्सने दिलेल्या अहवालानुसार, 2019 पासून झालेल्या हिंसक झटापटींमध्ये 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 22 लाख लोकांनी येथून पलायन केले आहे. मात्र याकडे नायजेरिया सरकार दुर्लक्ष करत असल्याने हल्लेखोरांचा अतिरेक वाढतच चालला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;