किम जोंग उनची पुन्हा सटकली; शस्त्रास्त्र उत्पादन वेगाने वाढवण्याचे दिले आदेश

किम जोंग उनची पुन्हा सटकली; शस्त्रास्त्र उत्पादन वेगाने वाढवण्याचे दिले आदेश

इराण आणि इस्रालय यांच्यातील युद्धाने आता भीषण रुप धारण केलं आहे. या युद्धामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच आता उत्तर कोरियाचा हुकुमशाहा किम जोंग उन याने जगाला आणखी चिंतेत लोटले आहे. त्याने देशातील शस्त्रास्त्र उत्पादन वेगाने वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जगभराची चिंता वाढली आहे.

इराण-इस्रायल यांच्यातील युद्धानंतर आता उत्तर कोरियात हालचाली वाढल्या आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनी देशातील शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचा दौरा केला. या कारखान्यांनी दारु-गोळ्याचे उत्पादन वाढवावे, असा आदेश त्याने दिल्याने जगाची चिंता वाढली आहे. किम जोंग उन यांनी आपल्या अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता कारखान्यांत बॉम्ब तसेच दारुगोळा निर्माण करण्याची गती वाढवावी, असं किम जोंग यांनी सांगितलं आहे.

सध्या जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे, असं काहीजण म्हणत आहेत. त्यामुळे ज्या देशाकडे सर्वाधिक शक्तिशाली शस्त्र, तोच देश भविष्यकालीन युद्धात तग धरू शकणार आहे. हीच बाब लक्षात घेता किम जोंग उन यांनी आपल्या प्रशासनाला थेट शस्त्रास्त्र उत्पादनाची गती वाढवण्याचा आदेश दिला आहे. उत्तर कोरियातील शासकीय माध्यम संस्था केसीएनएने तेथील शासकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

किम जोंग उन यांनी शुक्रवारी मेटल प्रेसिंग अँड असेब्ली युनिट्सला भेट दिली. येथे गेल्यानंतर त्यांनी 2025 सालातील पहिल्या सहामाईत किती दारु-गोळ्याची निर्मिती झाली, याची माहिती घेतली. तसेच तिथल्या अधिकाऱ्यांनाही फैलावर घेतलं. सध्याचे आधुनिक युद्ध लक्षात घेऊन अधिक शक्तिशाली दारु-गोळा तयार करायला हवा. तसेच उत्पादन क्षमता वाढवा असा आदेश त्यांनी दिला आहे.

उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांना आव्हान देणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचण्या करणे सुरूच ठेवले आहे आणि गेल्या महिन्यात दक्षिण कोरियाला जोडणारे रस्ते आणि रेल्वे उडवून दिले आहेत. तसेच उत्तर कोरिया आणि रशिया यांचे मैत्रीचे संबंध अधिक दृढ होत आहेत. तसेच जागतिक तणाव वाढत असताना किंम जोंग यांच्या आदेशामुळे हा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोटाच्या कॅन्सरमध्ये सुरवातीची लक्षणे काय असतात? वेळीच ओळखा अन्यथा प्राणघातक ठरू शकेल पोटाच्या कॅन्सरमध्ये सुरवातीची लक्षणे काय असतात? वेळीच ओळखा अन्यथा प्राणघातक ठरू शकेल
कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार असू शकतो. त्याचबरोबर दरवर्षी कर्करोगाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येते. हेल्थी न...
Pune Bridge Collapse : इंद्रायणी पूल दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर
Air India Plane Crash – अहमदाबादमधील विमान अपघातानंतर 11A सीटची मागणी वाढली, लकी जागा मिळवण्यासाठी प्रवाशांचा आटापिटा
मुंबईतील अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत करण्यात आली वाढ
Sindhudurg News – देवगडमध्ये एसटी आणि ट्रकची समोरासमोर धडक, एक जण जखमी
Rain Forecast : राज्यभरात पावसाचे धूमशान! रत्नागिरी आणि रायगडला रेड अलर्ट; कुठे कसा असेल पाऊस? वाचा
एसी किती तापमानावर ठेवावा? जेणेकरून सर्दी-खोकला होणार नाही अन् वीज बिलही कमी येईल