मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश; 328 शस्त्रास्त्रांसह स्फोटके जप्त

मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश; 328 शस्त्रास्त्रांसह स्फोटके जप्त

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असूनमणिपूर पोलीस, केंद्रीय सशस्त्र दल, लष्कराचे जवान आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकांनी राज्यातील पाच खोऱ्यात शोध मोहीम राबवली. काही जिल्ह्यात बेकायदा शस्त्रे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकांनी शोध मोहीम राबवली. या शोध मोहिमेत सुरक्षा दलांनी 328 शस्त्रांस्त्रांचा साठा, दारूगोळा आणि स्फोटके जप्त केली.

मे 2023 पासून जातीय आणि राजकीय अशांतता असलेल्या मणिपूरमध्ये शांतता प्रस्थआपित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात सुरक्षा दलाच्या शोध मोहिमेला मोठे यश मिळाले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये 151 एसएलआर रायफल्स, 65 आयएनएसएएस रायफल्स, 73 इतर रायफल्स, 5 कार्बाइन गन, 2 एमपी 5 गन, 12 एलएमजी रायफल्स, 6 एके-सिरीज रायफल्स, 2 अमोघा रायफल्स, 1 एआर-15 रायफल, 1 मोर्टार, 6 पिस्तूल, 2 बंदुकीच्या बॅरल्स आणि 2 फ्लेअर गन यांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये 10 ग्रेनेड, तीन लेथोड्स, सात डेटोनेटर आणि तीन पॅरा शेल्सचा समावेश आहे.

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच बेकायदेशीर शस्त्रांशी संबंधित कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा केंद्रीय नियंत्रण कक्षाला कळविण्याचे आवाहन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;