कामाची बात! तत्काळ पासपोर्ट तीन दिवसांत हातात

कामाची बात! तत्काळ पासपोर्ट तीन दिवसांत हातात

अचानक परदेशात जायची वेळ आली आणि पासपोर्ट काढलेला नसेल तर अनेकांची तारांबळ उडू शकते, परंतु यासाठी तत्काळ पासपोर्टची सुविधा आहे. तत्काळ पासपोर्ट सेवाअंतर्गत अवघ्या तीन दिवसांत पासपोर्ट मिळू शकतो. यासाठी मेडिकल इमर्जन्सी, ऑफिशियल काम किंवा अन्य महत्त्वाचे कारण सांगून तत्काळ पोसपोर्टसाठी अर्ज केला जाऊ शकतो. तत्काळ योजनेअंतर्गत अर्ज केल्यास कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवसांच्या आत पासपोर्ट मिळण्याची सुविधा आहे. सर्वसाधारणपणे पासपोर्ट काढायचा असेल तर किमान 15 दिवस ते दीड महिना लागतो, परंतु तत्काळ पासपोर्ट सेवाअंतर्गत अवघ्या 3 दिवसांत पासपोर्ट काढला जाऊ शकतो. हा पासपोर्ट काढण्यासाठी आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, सरकारी किंवा खासगी नोकरीचे ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स असणे आवश्यक आहे. तत्काळ पासपोर्टअंतर्गत अर्ज केल्यास कार्यालयीन तीन दिवसांच्या आत पासपोर्ट घरी पाठवला जातो.

अर्ज कसा कराल

पासपोर्ट मिळवण्यासाठी ऑनलाइन किंवा जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्र, जवळचे पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन अर्ज भरता येऊ शकतो. अर्ज सादर केल्यानंतर पोलीस पडताळणी केली जाते. ती यशस्वी झाल्यास पोसपोर्ट कार्यालयाकडून पासपोर्ट जारी केला जातो. पासपोर्टसाठी वीज बिल, रहिवासी पुरावा, कोणतेही गुन्हे नसल्याचा पुरावा आणि केंद्र सरकारने ठरवून दिलेली फी भरणे आवश्यक आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;