सिल्लोड तालुक्यात वीज पडून 4 जणांचा मृत्यू; मृतांत दोन सख्ख्या भावांचा समावेश

सिल्लोड तालुक्यात वीज पडून 4 जणांचा मृत्यू; मृतांत दोन सख्ख्या भावांचा समावेश

सिल्लोड तालुक्यात वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला असून मृतांत दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या दुर्घटनेत चार जनावरेही दगावली आहेत. सिल्लोड तालुक्याला शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने झोडपून काढले. सारोळा येथे शेतात काम करत असतानाच यश राजू काकडे (वय – 14) आणि रोहित राजू काकडे (वय – 21) या दोघा भावांचा वीज पडून मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, आजी, आजोबा असा परिवार आहे.

मोढा बुद्रुक शिवारात वीज कोसळून रंजना बापूराव शिंदे (वय – 50) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

मौजे पिंपळदरी येथे शिवाजी सतीश गव्हाणे (वय – 30) याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ जीवन गव्हाणे याचे दोन्ही पाय वीज पडल्याने निकामी झाले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्वी शिवारात नारायण बांबर्डे यांची एक म्हैस तसेच मांडणा शिवारातील ज्ञानेश्वर लोखंडे यांची तीन वासरे वीज पडून ठार झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;