अरे देवा! यवतमाळच्या भाविकांवर केदारनाथमध्ये काळाचा घाला, हेलिकॉप्टर दुर्घटनेत पती-पत्नीसह 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू
उत्तराखंडमधील केदारनाथ येथे रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जैस्वाल कुटुंबाने या दुर्घटनेमध्ये जीव गमावला आहे. राजकुमार जैश्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जैस्वाल आणि दोन वर्षांची मुलगी काशी जैस्वाल अशी मृतांची नावे आहेत.
उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाने (यूसीएडीए) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे केदारनाथ धामहून गुप्तकाशीकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. गोरीकुंड आणि त्रिजुणी नारायण दरम्यानच्या जंगलामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण 7 जण होते. या सातही जणांचा अपघतामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.
आर्यन एव्हिगेशनचे हे बेल 407 व्हीटी-बीकेए हेलिकॉप्टर होते. पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. त्यानंतर शोध मोहीम सुरू केल्यावर हेलिकॉप्टर कोसळल्याचे स्पष्ट झाले. अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघाताचे ठिकाण अतिशय दुर्गम भागात असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते.
दरम्यान, या हेलिकॉप्टर अपघातामध्ये पायलटसह सातही प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश असून अन्य प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथील होते. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातानंतर हेलिकॉप्टरचे तुकडेतुकडे झाले असून घटनास्थळी मृतदेहाचे छिन्नविछिन्न अवशेष पडले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Uttarakhand | A helicopter crash took place on the Kedarnath route, in the Gaurikund area under Rudraprayag district. According to preliminary information, bad weather is being considered as the possible cause of this accident. A total of 07 people were on board the helicopter.… pic.twitter.com/LetPONJwKy
— ANI (@ANI) June 15, 2025
गढवालचे पोलीस महानिरीक्षक राजीव स्वरुप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रविवारी पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी हेलिकॉप्टरने केदारनाथ धामहून गुप्तकाशीकडे उड्डाण घेतले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. याची माहिती मिळताच शोध आणि बचाव पथकाला रवाना करण्यात आले. शोधमोहिमेदरम्यान गौरीकुंडपासून 4 किलोमीटर वर हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. अपघातात हेलिकॉप्टरमधील सात जणांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहेत. दरम्यान, उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापनाकडून 1070, 01352710334 आणि 9058441404 हे टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
#WATCH | Uttarakhand helicopter crash: Sonika, CEO of Uttarakhand Civil Aviation Development Authority (UCADA), says, “Since the rescue operation is underway and seeing the weather conditions in the valley, our shuttle services have been closed. Almost all the helicopters are… pic.twitter.com/Z8INyyb3mk
— ANI (@ANI) June 15, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List