Sindhudurg News – हायवेवर सापडलेली बॅग मुळ मालकाला केली परत, नांदगाव ग्रामस्थांची माणुसकी

Sindhudurg News – हायवेवर सापडलेली बॅग मुळ मालकाला केली परत, नांदगाव ग्रामस्थांची माणुसकी

गोव्याहून देवगडच्या दिशने निघालेले डॉ. प्रमोट आपटे हे नांदगाव तिठा येथे आले असता बॅग विसरून देवगडच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. मात्र, काही अतंर पुढे गेल्यानंतर बॅग विसरल्याच त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी तत्काळ गाडी वळवून नांदगावच्या दिशेने नेली. यावेळेत नांदगावातील ग्रामस्थांनी माणुसकीच्या नात्याने बॅग आपल्या ताब्यात घेतली आणि पोलिसांच्या स्वाधिन केली आणि त्यानंतर बॅगचे मुळ मालक डॉ. प्रमोद आपटे यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पणजी गोवा येथून डॉ. आपटे हे बसने प्रवास करत असताना कोळंबा मंदिर समोरील ब्रिजवर उतरले. यावेळी त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी आला होता. या धावपळीत ते चुकून बॅग विसरून देवगडला निघून गेले. दुपारी 2 च्या सुमारास एक बेवारस बॅग नांदगावमधील कुणकेरकर यांना दिसली. त्यानंतर त्यांनी याची माहिती नांदगाव गावचे सरपंच भाई मोरजकर यांना दिली. त्यानंतर सरपंचांनी नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, ऋषिकेश मोरजकर यांच्या मदतीने सदर प्रकाराची माहिती कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप व बिट अंमलदार चंद्रकांत झोरे यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये आधार कार्ड सापडले आणि डॉ. प्रमोद आपटे यांची बॅग असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर डॉ. आपटे यांच्याशी संपर्क साधून सरपंचांच्या हस्ते त्यांना बॅग सुपूर्द करण्यात आली. यावेळी डॉ. आपटे यांनी नांदगाव ग्रामस्थांचे आणि सरपंचांचे आभार मानले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;