खेळाप्रमाणे राजकरणात देखील टीमवर्क गरजेचं – आदित्य ठाकरे

खेळाप्रमाणे राजकरणात देखील टीमवर्क गरजेचं – आदित्य ठाकरे

खेळाप्रमाणे राजकरणात देखील टीमवर्क गरजेचं आहे, असं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त बालेवाडी येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले की, “बालेवाडी येथे क्रीडा महोत्सवात अनेक खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे. माझं वाढदिवस हे निमित्त आहे. मात्र मला वाटतं जून, जुलै महिन्यात आपण पाहतो. माझा वाढदिवस असेल, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असेल, तसेच जानेवारीत माझे आजोबा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस असेल. माझ्या आजोबांनी अनेक वर्ष सांगितलं आहे. पक्ष कशासाठी आहे आहेत, तर 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकरण यासाठी. 80 टक्के समाजकारणात मोठा वाटा हा खेळाचा आहे. राजकारणाचे खेळ आपले वेगळे असतात, ते चालूच राहतात.”

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “कुठच्याही कार्यक्रमामध्ये आणि खासकरून खेळाच्या कार्यक्रमात मी एकच प्रेरणा घेतो, ती म्हणजे टीमवर्क. बॅडमिंटन सारखा खेळ तुम्ही एकटे खेळाला, डबल असेल किंवा सिंगल असेल. तुम्ही एकटे खेळता. पण तुम्ही एकटे जेव्हा खेळत असता तेव्हा तुमच्या मागे मोठं टीमवर्क असतं. तुमचे कोच असतात, तुमचे कुटुंबीय असतात. तुमचे फॅन्स असतात. टीमवर्क प्रत्येक ठिकाणी गरजेचं असतं. तसेच राजकरणात देखील टीमवर्क गरजेचं आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहात नाही तर ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील तंदुरस्त पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहात नाही तर ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील तंदुरस्त
महाराष्ट्रात असे काही ठिकाणं आहेत जिथे उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा पारा 45 ते 50 अंशांपर्यंत पोहोचतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांचा धोका...
ब्रिटिश फायटर जेटचे केरळमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग, इंधन संपल्यामुळे पायलटने मागितली होती परवानगी
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही, 12 मृतदेह कुटुंबीयांकडे सुपुर्द
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट
Hillang Yajik – शरीरसौष्ठवाच्या सौंदर्यानं जिंकलं सोनं, अरुणाचलच्या हिलांग याजिकनं रचला इतिहास
अमेरिकेत परेड Vs निदर्शने! लष्करी परेड आणि स्वतःच्या वाढदिवसावर ट्रम्प यांनी उडवले 350 कोटी; निषेध व्यक्त करत जनतेची निदर्शने
दैवी चमत्कारच! ढिगाऱ्याखाली 3 महिन्यांचं बाळ जिवंत सापडलं, बचाव पथकाने व्यक्त केले आश्चर्य