शनिशिंगणापूर देवस्थानमधील 167 कर्मचारी सेवेतून बडतर्फ, 114 मुस्लिम; 53 इतर कर्मचाऱ्यांचा समावेश

शनिशिंगणापूर देवस्थानमधील 167 कर्मचारी सेवेतून बडतर्फ, 114 मुस्लिम; 53 इतर कर्मचाऱ्यांचा समावेश

तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानमधील वादग्रस्त अवांतर नोकरभरतीचा मुद्दा गाजत असतानाच, शनी मंदिरात मुस्लिम तरुणांच्या भरतीने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली होती. मंदिरातील कर्मचाऱ्यांची अनियमितता व हलगर्जीपणाचा ठपका ठेवत 167 कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना शुक्रवारपासून सेवेतून बडतर्फ केले. दरम्यान, बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 114 मुस्लिम तरुणांचा समावेश आहे.

तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाची बैठक 12 रोजी संपन्न झाली. यामध्ये विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना कायमचे काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनेने उभारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला असल्याची चर्चा मंदिर परिसरात आहे. पवित्र शनी मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेण्यात आले होते. यामुळे अहिल्यानगर जिह्यासह राज्यभर खळबळ उडाली होती.

शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये गेल्या चार-पाच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांमध्ये अनियमितता व कामावर हजर न राहणे, याबाबी पुढे आल्याने मंदिरातील 167 कर्मचाऱ्यांना 12 जूनपासून कामावरून कमी करण्यात आले. तसे संबंधित कर्मचाऱ्यांना रजिस्टर नोटिसांमार्फत कळवले आहे, असे शनेश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरख दरंदले यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;