जम्मू-कश्मीरमध्ये राजकीय बॉम्ब फुटला; ‘आप’ने ओमर अब्दुल्ला सरकारचा पाठिंबा काढला

जम्मू-कश्मीरमध्ये राजकीय बॉम्ब फुटला; ‘आप’ने ओमर अब्दुल्ला सरकारचा पाठिंबा काढला

जम्मू-कश्मीरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आम आदमी पार्टीने ओमर अब्दुल्ला सरकारचा पाठिंबा काढला आहे. आपचे एकमेव आमदार आणि प्रदेशाध्यक्ष मेहराज मलिक यांनी शनिवारी एक्स (आधीचे ट्विटर) यावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली.

कलम 370 हटवल्यानंतर 2024 पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने स्पष्ट बहुमत मिळवले होते. 90 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने 42 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 6 जागांवर विजय मिळवला होता. नॅशनल कॉन्फरन्सला पाच अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे आपने पाठिंबा काढला असला तरी अब्दुल्ला सरकारला कोणताही धोका नाही.

‘मी, डोडा मतदारसंघाचा आमदार मेघराज मलिक नॅशनल कॉन्फरन्स सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेत आहे. जम्मू-कश्मीरच्या लोकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांचा विश्वास आणि कल्याण याला नेहमीच माझे सर्वोच्च प्राधान्य असेल’, असे मेघराज मलिक यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कोण आहेत मेघराज मलिक?

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने इतिहास रचत पहिल्यांदाच जम्मू-कश्मीरमध्ये खाते उघडले होते. आपचे उमेदवार मेघराज मलिक यांनी डोडा मतदारसंघातून भाजपच्या गजय सिंह राणा यांचा 4538 मतांनी पराभव केला होता. याच वर्षी जानेवारी महिन्यात त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदही सोपवण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;