Manali Zipline Incident – मनालीत झिपलाइन करताना केबल तुटली, 30 फूट उंचीवरून कोसळल्याने नागपूरची तरुणी गंभीर जखमी

Manali Zipline Incident – मनालीत झिपलाइन करताना केबल तुटली, 30 फूट उंचीवरून कोसळल्याने नागपूरची तरुणी गंभीर जखमी

मनालीत झिपलाइन करताना केबल तुटल्याने 30 फूट उंचीवरून खाली कोसळल्याने नागपूरची तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. त्रिशा बिजवे असे जखमी तरुणीचे नाव आहे. त्रिशावर नागपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पर्यटन साहसी स्थळांवरील सुरक्षा नियमांबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. कुटुंबीयांनी या अपघाताचा व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे.

नागपूरमधील बिजवे कुटुंबीय उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी 8 जून रोजी मनाली येथे गेले होते. यावेळी झिपलाइन करत असताना अचानक केबल तुटली आणि त्रिशा 30 फूट उंचीवरून खाली कोसळली. यात त्रिशाच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. जखमी त्रिशाला मनाली येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्रिशाला चंदीगड येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या नागपूरातील खासगी रुग्णालयात त्रिशावर उपचार सुरू आहेत.

या अपघातप्रकरणी बिजवे कुटुंबाने साहसी खेळाच्या ठिकाणी अपुरी सुरक्षा व्यवस्था असल्याचा आरोप केला आहे. तसेच अपघातानंतर आपत्कालीन प्रतिसादाचा अभाव असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;