पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह जिल्ह्यात सातत्याने वाढ होणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या शनिवारी कमी झाल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात पन्नाशी पार केलेल्या दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 पर्यंत खाली आली आहे. आज दिवसभरात नोंद झालेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 11, पिंपरी-चिंचवड शहरातील 3, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 2 रुग्णाचा समावेश आहे.

राज्यभारत शनिवारी दिवसभरात 53 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक 24 रुग्ण मुंबईमध्ये आढळून आले आहेत. पुणे शहरात 11, पिंपरी-चिंचवड 3 आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1 रुग्णाची नोंद झाली. नवीन मुंबई 1, ठाणे 5, सांगली 4 आणि नागपूरमध्ये 2 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात 1 जानेवारी ते 12 जून या कालावधीत 21 हजार 67 संशियत रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात 1 हजार 967 जणांना कोरोनाचे निदान झाले. तसेच आतापर्यंत 1 हजार 362 रुग्ण बरे झाले आहेत, तर मृत्यू रुग्णांचा आकडा 27 वर पोहोचला आहे. मृत्यू झालेले सर्व रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. राज्यात सध्या 578 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 69.24 टक्क्यांवर पोहोचले असल्याचे राज्य आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;