Air India Crash – लग्नानंतर बाळासाठी प्रयत्न करत होते दाम्पत्य, पण अपघातामुळे सगळ्या स्वप्नांची झाली राख

Air India Crash – लग्नानंतर बाळासाठी प्रयत्न करत होते दाम्पत्य, पण अपघातामुळे सगळ्या स्वप्नांची झाली राख

गुजरातमध्ये राहणारे हर्षित आणि पुजा लंडनला निघाले होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि अपघातात त्यांचा मृत्यू झाला. हर्षित आणि पुजा हे बाळासाठी प्रयत्न करत होते, पण त्यांचं हे स्वप्न अपूर्णचं राहिलं.

अहमदाबादमध्ये राहणरे अनिल पटेल यांचा मुलगा हर्षित आणि पूजा कामानिमित्त लंडनमध्ये राहत होते. सात वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. सहा वर्षांपूर्वी अनिल पटेल यांच्या पत्नीचे कॅन्सरमुळे निधन झाले होते. त्यामुळे मुलगा आणि सून त्यांचं जग होतं. पूजा आपल्या मुलीसारखी होती अशी माहिती पटेल यांनी दिली.

लग्नानंतर हर्षित आणि पूजाने बाळासाठी प्रयत्न केला होता. पण पहिल बाळं पूजाच्या पोटातचं दगावलं. हर्षित आणि पूजा दोघेही बाळासाठी पुन्हा प्रयत्न करत होते. पूजाच्या उपचारासाठी दोघेही अहमदाबादमध्ये आले होते. नंतर दोघेही लंडनला निघाले. अनिल पटेल यांनी दोघांना एअरपोर्टवर सोडलं. विमानात बसल्यावर दोघांनी अनिल यांना व्हिडीओ कॉल करून विमानात बसल्याचे सांगितले. बाकी पोहोचल्यावर फोन करू असे म्हणत हर्षितने फोन ठेवला. पण थोड्याच वेळात विमानाचा अपघात झाला आणि दोघांचा यात मृत्यू झाला. प्रशासनाने आपले डीएने नमुने घेतले आहेत, ते जुळल्यानंतर मृतदेह ताब्यात देतील. त्या दोघांचे अंत्यसंस्कार झाल्यावर मी आयुष्यात एकटाच राहिन अशी खंत पटेल यांनी व्यक्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;