2030 पर्यंत हीट अँड रेनचा तडाखा दुप्पट बसणार; मुंबई, ठाणे, दिल्ली, चेन्नई, सुरत, हैदराबाद शहरांचा समावेश

2030 पर्यंत हीट अँड रेनचा तडाखा दुप्पट बसणार; मुंबई, ठाणे, दिल्ली, चेन्नई, सुरत, हैदराबाद शहरांचा समावेश

देशात पुढील पाच वर्षांत म्हणजेच 2030 पर्यंत उन्हाचे चटके दुपटीने बसणार असून त्याच पटीत पावसाचा कहर पाहायला मिळेल, असा इशारा एका नव्या अहवालातून देण्यात आला आहे. देशातील मुंबई, दिल्ली, ठाणे, चेन्नई, सुरत, हैदराबाद, पटणा आणि भुवनेश्वर या प्रमुख शहरांचा यात समावेश आहे. पुढील पाच वर्षांत या शहरातील उष्णेतेची लहर दुप्पट होऊ शकते. तसेच मान्सूनमध्येही लोकांना उष्णतेची लहर जाणवू शकते. वेदरिंग द स्टोर्म, मॅनेजिंग मान्सून इन अ वार्ंमग क्लामेट या नावाने प्रसिद्ध झालेल्या एसरी इंडिया आणि आंतरराष्ट्रीय विकास समूह आयपीआय ग्लोबलने संयुक्तरीत्या हा अहवाल जारी केला आहे. जलवायू तज्ञ अविनाश मोहंती आणि पृष्ण पुमार वासव यांनी हा रिपोर्ट तयार केला आहे. रिपोर्टनुसार, उष्ण हवेमुळे हिट आणि पाऊससुद्धा अनियमित व मुसळधार होऊ शकतो. भारताच्या जवळपास 80 टक्के जिह्यांत 2030 पर्यंत मान्सूनमध्ये पाऊस आणि उष्णता दोन्ही पाहायला मिळेल. 2030 पर्यंत देशभरात 2.5 पट उष्णता वाढू शकते, तर जोरदार पावसाच्या घटनेत 43 टक्के वाढ होऊ शकते. 1993 ते 2024 यादरम्यान मार्च ते सप्टेंबरपर्यंत उष्ण लाटेच्या दिवसात 15 पट वाढ झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;