Mumbai Crime News – शरीरसंबंधांना नकार दिल्याने पतीकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चेंबूरमधील धक्कादायक घटना

Mumbai Crime News – शरीरसंबंधांना नकार दिल्याने पतीकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चेंबूरमधील धक्कादायक घटना

मुंबईतील चेंबूर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. शरीरसंबंधांना नकार दिल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत गंभीर भाजलेल्या महिलेवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

काय घडलं नेमकं?

चेंबूर परिसरात राहणारी पीडित महिला घरकाम करते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती कामावर जायला निघत होती. यावेळी तिच्या पतीने तिच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली. मात्र कामावर जायला उशिर होत असल्याचे सांगत पत्नीने याला नकार दिला. यामुळे पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात पत्नीने स्वतःवर रॉकेल ओतून घेतले. यानंतर आरोपीने तिच्यावर जळत्या कागदाचा तुकडा फेकला. यात महिलेची छाती, पोट, पाय आणि हात गंभीर भाजले. महिलेला तात्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आले. तिची प्रकृती गंभीर आहे.

महिलेच्या तक्रारीवरून, आरसीएफ पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 109(1), 352 आणि 115(2) अंतर्गत आरोपीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;