Air India Plane Crash – विमान दुर्घटनेत होरपळलेल्या मृतदेहांची ओळख पटेना, DNA टेस्टला विलंब; कुटुंबांची प्रतीक्षा संपेना

Air India Plane Crash – विमान दुर्घटनेत होरपळलेल्या मृतदेहांची ओळख पटेना, DNA टेस्टला विलंब; कुटुंबांची प्रतीक्षा संपेना

अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या विमान अपघातात 270 जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर विमानाचा स्फोट झाला आणि आग लागली. या आगीत विमानातील प्रवाशांसह जेथे विमान कोसळले त्या बीजी मेडिकल वसतिगृहातील शिकाऊ डॉक्टर आणि आसपासच्या काही नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघाताला तीन दिवस उलटूनही, मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

अपघातात सर्व मृतदेह जळाल्याने त्यांची ओळख पटवणे कठिण होत आहे. अशा परिस्थितीत मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना डीएनए चाचणीसाठी नमुने देण्याची आवाहन केले होते. त्याप्रमाणे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये आतापर्यंत 230 हून अधिक डीएनए नमुने गोळा करण्यात आले आहेत, त्यापैकी सहा नमुने शनिवारी सकाळी घेण्यात आले. डीएनए प्रोफाइलिंग सुरू आहे आणि निकाल येताच पीडित कुटुंबांना कळवले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुजरात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) चे संचालक एचपी संघवी यांनी सांगितले की, तीव्र ज्वाला आणि उच्च तापमानामुळे मृतदेहांच्या डीएनएवरही परिणाम झाला आहे. आम्ही शरीराच्या संरक्षित भागांमधून डीएनए नमुने काढण्याचा प्रयत्न करत आहोत. एफएसएल आणि राष्ट्रीय फॉरेन्सिक लॅबची 36 सदस्यांची तज्ज्ञ टीम एकत्र काम करत आहे. प्रत्येक डीएनए चाचणीला सुमारे 36 ते 48 तास लागत आहेत. प्रोफाइल जुळणी सुरू झाली आहे आणि काही सकारात्मक निकाल येऊ लागले आहेत.

प्रशासनाने कुटुंबातील सदस्यांच्या सोयीसाठी “सिंगल विंडो सिस्टम” ची व्यवस्था केली आहे, ज्या अंतर्गत ओळख पटल्यानंतर मृतदेह आणि मृत्यू प्रमाणपत्रे सुपूर्द केली जातील. पीडित कुटुंब आपल्या प्रियजनांना अंतिम निरोप देण्यासाठी वाट पाहत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;