प्रेसिडंट ट्रम्प इस्रायल- इराण युद्ध का थांबवत नाही? संजय राऊत यांचा सवाल

प्रेसिडंट ट्रम्प इस्रायल- इराण युद्ध का थांबवत नाही? संजय राऊत यांचा सवाल

इस्रायल- इराण युद्धामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही देशातील युद्धामुळे जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे. आता या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात जीवितआणि वित्तहानी होत असताना प्रेसिडंट ट्रम्प हे युद्ध का थांबवत नाहीत, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच त्यांनी मोदी यांच्या परदेश दौऱ्यावरून जबरदस्त टोला लगावला.

अमेरिकेचे प्रेसिडंट ट्रम्प यांनी मोदी, शहा यांना व्यापाराची धमकी देत हिंदुस्थान- पाकिस्तान युद्ध थांबवले. तसेच त्यानंतर सुमारे 20 वेळा युद्धच आपणच थांबवले, असा डांगोरा ते पिटत आहेत. दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज देश असून हे युद्ध धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे आपणच युद्ध थांबवले असून मोठी हानी टाळली आहे, असे ते सांगत आहेत. आता इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाले असून ते दोन्ही अण्वस्त्रसज्ज आहेत. ते दोन्ही देश मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा वापर करत आहेत. आता प्रेसिंडट ट्रम्प यांनी पुढाकार घेत इस्रायल- इराण युद्ध थांबवावे. त्यांनी मोदी, शहा यांना धमकी दिली आणि युद्ध थांबवले. मात्र, आता इस्रायल किंवा इराण प्रेसिडंट ट्रम्प यांचे ऐकायला तयार नाहीत. आता प्रेसिंडट ट्रम्प हे युद्ध थांबवत का नाहीत? असा सवालही त्यांनी केला.

संभाव्य धोका आणि स्वाभिमानासाठी हे दोन्ही देश लढत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ट्रम्प यांचे काही चालत नाही. हिंदुस्थानने दहशतवादाशी लढाई सुरू केली होती. हीदेखील स्वाभिमानाची लढाई होती, असे असताना ट्रम्प यांनी हिंदुस्थान- पाकिस्तान युद्ध का थांबवले? तसेच ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून आपण हे युद्ध का थांबवले, असा सवालही त्यांनी केला. आपण दहशतवादाविरोधात युद्ध सुरू केले असे मोदी सांगतात, ते युद्ध ट्रम्प यांच्या दबावामुळे त्यांनी थांबवले. आता ते कॅनडा, सायप्रस, क्रोशिया अशा देशांमध्ये गेले आहेत. तेथे ते प्रवचने देतील, असा टोलाही त्यांनी हाणला.

इस्रायल- इराण युद्धामुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी होत आहे. या युद्धामुळे पूर्ण जगाला धओका निर्माण झाला आहे. त्यामुळे हिंदुस्थान -पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी प्रेसिडंट ट्रम्प यांनी पुढाकार घेत जेवढे प्रयत्न केले. तेच प्रयत्न त्यांनी इस्रायल- इराण युद्ध थांबवण्यासाठी केले पाहिजे आणि ह युद्ध थांबवले पाहिजे, असे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;