Air India Crash – अपघातात जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Air India Crash – अपघातात जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती नागरी व उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. तसेच ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांची ओळख पटवून त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुबीयांकडे सोपवणं हे सर्वाधिक आव्हानात्मक आहे असेही मोहोळ म्हणाले.

इंडियन एक्सप्रेसला मुरलीधर मोहोळ यांनी मुलाखत दिली आहे. त्यात मोहोळ म्हणाले की, मृतांपैकी 220 मृतदेहांचे डीएनए नमुने घेतले आहेत. त्यापैकी आठ मृतदेहांची ओळख पटली असून त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 50 जखमींवर उपचार सुरु होते. त्यातील 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काही जखमींची तब्येत अद्याप गंभीर असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

आता सर्वात मोठे आव्हान म्हणजे मृतांची ओळख पटवण्याची आहे असे मोहोळ म्हणाले. तसेच मृतांची ओळख पटल्यास तातडीने त्यांच्या आप्तस्वकीयांकडे त्यांचे मृतदेह सोपवले जातील असे मोहोळ यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Israel-Iran Conflict : इराणमधील मशहद विमानतळावर इस्रायलचे हवाई हल्ले, इंधन भरणाऱ्या विमानाला केलं लक्ष्य Israel-Iran Conflict : इराणमधील मशहद विमानतळावर इस्रायलचे हवाई हल्ले, इंधन भरणाऱ्या विमानाला केलं लक्ष्य
गेल्या तीन दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या हवाई दलाने पूर्व इराणमधील मशहद विमानतळावर हल्ला केला आहे. ऑपरेशन...
Pune Bridge Collapse : इंद्रायणी पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती
Chandrapur News – घरगुती वादातून पत्नीकडून पतीची हत्या, आरोपी महिलेला अटक
माथेरानमधील शॉर्लोट तलावात तीन जण बुडाले, सह्याद्री रेस्क्यू टीमकडून शोध सुरू
दररोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने लिव्हर खरंच साफ होतं का?
जागतिक डेंग्यू दिन 2025 निमित्त “साथ लढूया डेंग्यूशी” मोहीम सुरू; TV9 नेटवर्क, ऑल आऊट आणि इंडियन मेडिकल असोसिएशनची भागीदारी
Israel-Iran Conflict : हिंदुस्थान-पाकिस्तानप्रमाणे इस्रायल-इराण वादही मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य