नीरज चोप्राचे नव्या विक्रमावर लक्ष! पॅरिस डायमंड लीगमध्ये कौशल्य पणाला लावणार

नीरज चोप्राचे नव्या विक्रमावर लक्ष! पॅरिस डायमंड लीगमध्ये कौशल्य पणाला लावणार

हिंदुस्थानचा भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता नीरज चोप्रा २० जूनला होणाऱ्या पॅरिस डायमंड लीगमध्ये प्रथमच सहभागी होणार आहे. आठ वर्षांनंतर नीरज या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या पॅरिस टप्प्यात आपले कौशल्य पणाला लावणार आहे. सलग दोन स्पर्धांमध्ये उपविजेता ठरलेला नीरज यंदा विजेतेपदाच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

गेल्या वर्षी ऑलिम्पिकच्या तयारीमुळे नीरजला पॅरिस लीगला मुकावे लागले होते. मात्र, यंदा तो पूर्ण ताकदीने या लीगमध्ये उतरणार आहे. नीरजने याआधी 2017 मध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन म्हणून पॅरिस डायमंड लीगमध्ये भाग घेतला होता. त्या वेळी त्याने 84.67 मीटर भालाफेक करत पाचवे स्थान पटकावले होते.

स्पर्धेच्या आयोजकांनी अद्याप सर्व स्पर्धकांची यादी जाहीर केलेली नसली, तरी त्यांनी नीरज आणि दोन वेळचा विश्वविजेता ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स यांचा सहभाग निश्चित केला आहे. हे दोघेही अशा पाच स्पर्धकांमध्ये आहेत, ज्यांनी याआधी 90 मीटरचा टप्पा पार केलेला आहे.

नीरजने 2025 सत्राची सुरुवात दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेत विजेतेपदाने केली होती. त्या स्पर्धेत त्याने 84.52 मीटरचा थ्रो केला होता. त्यानंतर दोहा डायमंड लीगमध्ये त्याने 90.23 मीटर फेकी करत 90 मीटरचा जादुई टप्पा पार केला. आता पॅरिस डायमंड लीगमध्ये नीरज नव्या विक्रमाच्या उद्देशाने उतरणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;