Nagpur News – नागपूरमध्ये इलेक्ट्रीक सामानाच्या गोदामाला भीषण आग, दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Nagpur News – नागपूरमध्ये इलेक्ट्रीक सामानाच्या गोदामाला भीषण आग, दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

नागपूर शहरातील महाल परिसरात एका इलेक्ट्रिक सामानाच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत गोदाम मालकासह दोघांचा होरपळून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शनिवारी सायंकाळी ही आग लागली. अथक प्रयत्न करत अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

गिरीश खत्री आणि विठ्ठल धोते अशी मयतांची नावे आहेत तर गुणवंत नागपूरकर असे जखमीचे नाव आहे. गिरीश खत्री यांचे महल परिसरातील जुम्मा मस्जिदजवळ जय कॉम्प्लेक्समध्ये इलेक्ट्रीक दुकान आहे. या दुकानाच्या वरच्या फ्लॅटमध्ये इलेक्ट्रीक वस्तूंचे गोदाम आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास गोडाऊनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. यादरम्यान वेल्डिंगमधून निघालेली ठिणगी गोडाऊनमध्ये ठेवलेल्या फटाक्यांवर आणि इतर वस्तूंवर पडली, ज्यामुळे आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. आगीमुळे परिसरात घबराट पसरली. अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात महत्वाची भूमिका बजावली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;