सीरियामध्ये महिला आणि पुरुषांसाठी नवा ड्रेसकोड

सीरियामध्ये महिला आणि पुरुषांसाठी नवा ड्रेसकोड

सीरिया सरकारने महिला आणि पुरुष या दोघांसाठी एक नवीन ड्रेसकोड लागू केला आहे. नव्या ड्रेसकोडनुसार, महिलांना समुद्रकिनारी जायचे असेल तर पूर्ण कपडे घालणे बंधनकारक आहे, तर पुरुषसुद्धा समुद्रकिनारी शर्टलेस होऊ शकणार नाहीत. त्यांनासुद्धा कपडे घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या बंडानंतर सीरियामध्ये सत्तेवर आलेल्या अहमद अल-शारा यांच्या सरकारने देशात सांस्पृतिक बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे पर्यटनमंत्री माझेन अल-सलहानी यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. पुरुषांना सार्वजनिक ठिकाणी शर्टलेस जाण्यास मनाई करण्यात आली आहे, परंतु स्विमिंग एरिया, हॉटेल लॉबी आणि फूड सर्व्हिस एरियाच्या बाबतीत शिथिलता देण्यात आली आहे. समुद्रकिनारी आणि स्विमिंग पूल क्षेत्राबाहेर, सार्वजनिक ठिकाणी खांदे व गुडघे झाकणारे सैल कपडे घालणे चांगले. पारदर्शक किंवा खूप घट्ट कपडे घालणे टाळा, असे या आदेशात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;