Sindhudurg News – फोंडाघाटात दोन ट्रक समोरासमोर धडकले, दोन जण जखमी; एकावर गुन्हा दाखल

Sindhudurg News – फोंडाघाटात दोन ट्रक समोरासमोर धडकले, दोन जण जखमी; एकावर गुन्हा दाखल

फोंडाघाट येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एका ट्रकचा चालक आणि दुसऱ्या ट्रकचा क्लीनर जखमी झाला. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात एका ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फोंडाघाटातील पूनम हॉटेल नजीकच्या वळणावर शनिवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ओंकार शिवानंद उदगट्टी असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.

दिनेश प्रकाश बेगडे (रा. करवीर – कोल्हापूर) हे आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन फोंड्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. यादरम्यान फोंडा घाटातील पूनम हॉटेल मॅजिकच्या एका वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकने बेगडे यांच्या ट्रकला धडक दिली. या अपघातात दिनेश बेगडे यांच्या दोन्ही गुडघ्यांना गंभीर दुखापत झाली तर दुसऱ्या ट्रकमधील क्लीनर शिवानंद उदगट्टी यांना किरकोळ दुखापत झाली. जखमी दिनेशला कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;