सुषमा रेपेंनी दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ केली पूर्ण

सुषमा रेपेंनी दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ केली पूर्ण

दक्षिण आफ्रिकेतील दरवर्षी होणारी अत्यंत खडतर अशी 90 किलोमीटरची ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ सांगलीतील आरटीओ कार्यालयातील महिला लिपिक सुषमा रेपे यांनी वेळेपूर्वी पूर्ण केली.

‘कॉम्रेड मॅरेथॉन’ ही जगातील सर्वांत जुनी आणि प्रतिष्ठत अल्ट्रामॅरेथॉनपैकी एक मानली जाते. या मॅरेथॉनला अंतिम मानवी शर्यत म्हणूनही ओळखले जाते. 1921 मध्ये ही मॅरेथॉन पहिल्यांदा आयोजित केली गेली होती. यामध्ये जगभरातून स्पर्धक सहभागी होतात. पहिल्या महायुद्धातील शहीद सैनिकांच्या सन्मान प्रीत्यर्थ या मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. डर्बन आणि पीटरमॅरिट्झबर्ग या शहरांदरम्यान घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत लवचिकपणा आणि सहनशक्तीचा कस लागतो.

‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’साठी हिंदुस्थानातील खेळाडूंना दोन 42 किमी मॅरेथॉन 4 तास 40 मिनिटांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असते. मूळच्या मुरगूड (जि. कोल्हापूर) येथील आणि सध्या सांगलीत आरटीओ कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत सुषमा रेपे यांनी 42 किमीच्या दोन मॅरेथॉन पूर्ण करत 4 तास 30 मिनिटांत पूर्ण करून कॉम्रेड मॅरेथॉनसाठी प्रवेश निश्चित केला होता. डर्बन येथे रविवारी डोंगराळ भागात ‘कॉम्रेड मॅरेथॉन’साठी स्पर्धक दाखल झाले होते. ही मॅरेथॉन 12 तासांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असते. सुषमा रेपे यांनी 90 किमी मॅरेथॉन 11 तास 22 मिनिटांत यशस्वी पूर्ण केली.

तीन वर्षे तयारी

सुषमा रेपे यांनी जवळपास तीन वर्षांपासून कॉम्रेड मॅरेथॉनची तयारी सुरू केली होती. दररोज त्यासाठी सराव सुरू होता. मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीमुळे त्यांना यश मिळाले. ‘अर्हता ग्रुप’ कोल्हापूर येथील प्रशिक्षक आशीष व पंकज रावळू यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सांगली कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, निरीक्षक अमित गुरव यांचे प्रोत्साहन मिळाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;