ऑपरेशन सिंदूरनंतर पाकड्यांची टरकली; हिंदुस्थानच्या धास्तीने संरक्षण बजेटमध्ये वाढ
हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकड्यांची चांगलीच तंतरलेली दिसत आहे. हिंदुस्थानची धास्ती घेत शाहबाज शरीफ सरकारने संरक्षण बजेट वाढवले आहे. शाहबाज सरकारमधील योजना मंत्री अहसान इकबाल यांनी संरक्षण बजेट वाढवण्याची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, आपला शेजारी देश अत्यंत खतरनाक आहे. यावरूनच पाकड्यांची टरकली असल्याचे स्पष्ट होत आहे.
अहसान इकबाल यांनी सांगितले की, आपला शेजारी देश किती खतरनाक आहे, हे याआधी सिद्ध झालं आहे. त्याने रात्रीच्या अंधारातही आमच्यावर हल्ला केला होता. याच कारणामुळे त्यांनी देशाच्या संरक्षण बजेटात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. संरक्षण खर्चात वाढ करण्याची योजना ही केवळ लष्करी दृष्टीकोनातूनच नाही, तर राजकीय आणि सामाजिक स्थिरतेसाठीही महत्त्वाची आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे की, आपल्याला सशस्त्र दलांना त्यांची क्षमता वाढवण्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व उपलब्ध करून द्यावे, असेही अहसान इकबाल यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान सरकारचे फक्त 1 ट्रिलियन रुपयांचं विकास बजेट आहे, तर गरज 3 ट्रिलियन रुपयांची आहे. या कमतरतेचा थेट परिणाम पायाभूत सुविधांवर आणि सामाजिक विकासावर होणार आहे. मात्र, असे असूनही हिंदुस्थानच्या धास्तीमुळे त्यांनी संरक्षण बजेट वाढवल्याचे स्पष्ट होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List