मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध विवाहितेची तक्रार; मानसिक व शारीरिक छळाचा गंभीर आरोप

मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध विवाहितेची तक्रार; मानसिक व शारीरिक छळाचा गंभीर आरोप

राज्याचे मिंधे गटाचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाठ यांच्यावर एका विवाहित महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जान्हवी सिद्धांत शिरसाट नामक महिलेने कायदेशीर नोटीस बजावून, सिद्धांत यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध मानसिक व शारीरिक छळ, फसवणूक, धमकी व हुंडाप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची सिद्धांत शिरसाट यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये चेंबूर येथील एका फ्लॅटवर शारीरिक संबंध झाले. सिद्धांत यांनी वारंवार आत्महत्येची धमकी देऊन भावनिक ब्लॅकमेल करत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. सिद्धांतच्या भावनिक आश्वासनावर विश्वास ठेवून लग्न केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. एवढ्यावरच न थांबता, या संबंधातून महिलेला गर्भधारणाही झाली होती. मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही महिलेने केला आहे.

संजय शिरसाट हे मंत्री असल्यामुळे पोलीस कार्यवाही न करता प्रकरण दाबल्याचा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आला आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, असे राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सामनाशी बोलताना स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;