नवी मुंबई पालिकेने भरपावसात 42 संसार उघड्यावर आणले; ऐरोलीत गरीबांची वस्ती बुलडोझरखाली चिरडली

नवी मुंबई पालिकेने भरपावसात 42 संसार उघड्यावर आणले; ऐरोलीत गरीबांची वस्ती बुलडोझरखाली चिरडली

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने पावसाळा सुरू झाल्यानंतर ऐरोली येथील सेक्टर 19 मधील 42 झोपड्यांवर बुलडोझर चालवला आहे. पालिकेच्या या सुलतानी कारवाईमुळे भरपावसाळ्यात गोरगरीबांचे संसार रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे पालिकेच्या या कारवाईविरोधात नवी मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर डोक्यावरील छप्पर बुलडोझरखाली चिरडले गेल्याने झोपडीवासींयांनी हंबरडा फोडला.

ऐरोली येथील सेक्टर 19 मधील भूखंड क्रमांक 74 वर अनधिकृत 42 झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. या झोपड्यांवर महापालिका प्रशासनाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे आणि उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड याच्या मार्गदर्शनाखाली बुलडोझर चालवला. या भूखंडांवर उभारण्यात आलेल्या सर्वच झोपड्या बेचिराग करण्यात आल्या. पावसाळा सुरू झाल्यानंतर निवासी वापर असलेल्या बांधकामांवर कारवाई करू नका, अशा सूचना न्यायालय आणि सरकारने दिलेल्या आहेत. मात्र त्यांना बगल देत महापालिका प्रशासनाने ऐरोलीतील गोरगरीबांच्या वस्तीवर धडक कारवाई केली. या कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात केला होता.

इमारतींना अभय, झोपड्यांना लक्ष
नवी मुंबईत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यानंतर अनधिकृत बांधकामाचे मोठे पेव फुटले आहे. दिघ्यापाठोपाठ घणसोली आणि गोठवली अनधिकृत बांधकामाचे मोठे हब तयार झाले आहे. मात्र या भागातील पालिका अधिकाऱ्यांचे भूमाफियांशी साटेलोटे असल्याने या इमारतींवर मात्र कोणतीच कारवाई केली जात नाही. या अनधिकृत इमारतींना अभय देऊन गोरगरीब झोपडीधारकांना मात्र लक्ष केले जात आहे, अशी टीका आता सर्व स्तरांतून होऊ लागली आहे.

बदली झाली तरी अधिकाऱ्यांना जागा सुटेना
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रिमण विरोधी विभागात काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांच्या महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बदली केली आहे. मात्र अनेक अधिकारी आपल्या पूर्वीच्याच जागेवर ठाण मांडून बसले आहेत. नवीन बदलीच्या ठिकाणी ते हजर होण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली विभागात गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याने येथील अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मिंधे गटाचे पदाधिकारी अशोध धोडी यांच्या हत्येप्रकरणी सख्ख्या भावाला अटक, 6 महिन्यानंतर अडकला पोलिसांच्या जाळ्यात मिंधे गटाचे पदाधिकारी अशोध धोडी यांच्या हत्येप्रकरणी सख्ख्या भावाला अटक, 6 महिन्यानंतर अडकला पोलिसांच्या जाळ्यात
मिंधे गटाचे डहाणू विधानसभा समन्वयक आणि माथाडी सेनेचे तालुका अध्यक्ष अशोक रमण धोडी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी तब्बल सहा महिन्यांनंतर मुख्य...
बाजारात फणसाचा घमघमाट! खरेदीसाठी उडाली झुंबड; वटपौर्णिमेनिमित्त मागणीत मोठी वाढ
Ratnagiri accident – रत्नागिरीत गॅस टँकरची खासगी ट्रॅव्हल्सला धडक; वायू गळतीमुळं आग, घरं जळाली, 7 गंभीर जखमी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ‘हायजॅक’, राहुल गांधींच्या लेखामुळे भाजप उघडानागडा पडला! – संजय राऊत
‘एचएसआरपी’ ला वाहनचालकांचा अल्प प्रतिसाद; 30 जून शेवटची तारीख, 16 जूनपासून इतर कामांना ब्रेक
Rinku Singh Priya Saroj – युरोपियन ते चायनीज; खायला सगळं मिळणार, पण फक्त ‘व्हेज’, रिंकू सिंहच्या साखरपुड्याचा मेन्यू व्हायरल
सर्जा-राजाच्या जोडीला लाखाचा भाव; वय कमी अन् ताकद जास्त