आयसीटीला अंबानींकडून 151 कोटींची देणगी

आयसीटीला अंबानींकडून 151 कोटींची देणगी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले त्या मुंबईतील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) कॉलेजला 151 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मुकेश अंबानी 1970 मध्ये या कॉलेजमधून पदवीधर म्हणून बाहेर पडले होते. काल शुक्रवारी आयसीटी कॉलेजमध्ये पद्मभूषण, प्राध्यापक एमएम शर्मा यांच्या ‘डिव्हाईन सायंटिस्ट’ या आत्मचरित्राच्या पुस्तक प्रकाशनासाठी आयोजित एका विशेष कार्यक्रमात मुकेश अंबानी उपस्थित होते. प्रोफेसर शर्मा आणि जे. बी. जोशी हे मुकेश अंबानीचे प्राध्यापक होते, याची आठवण मुकेश अंबानी यांनी कार्यक्रमात बोलताना करून दिली. अन्य देशांच्या संस्कृतीमध्ये गुरू हा फक्त शिक्षक असतो, परंतु भारतीय संस्कृतीत ‘गुरू ब्रह्मा आहे, गुरू विष्णू आहे, गुरू महेश्वर आहे’ असे मुकेश अंबीनी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

शिव नाडर सर्वात मोठे दानशूर

मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने 2023-24 या आर्थिक वर्षात तब्बल 407 कोटी रुपयांची देणगी दिलीय, तर शिव आणि त्यांच्या कुटुंबाने गेल्या वर्षी म्हणजेच 2023-24 या आर्थिक वर्षात 2,153 कोटी रुपये दान केले. म्हणजेच त्यांनी दररोज 5.90 कोटी रुपये दान केले. याचाच अर्थ शिव नाडर हे देशातील सर्वात मोठे दानशूर आहेत. मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, तर शिव नाडर हे जगातील 52 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;