EU सोबत कोणताही करार करू इच्छित नाही, 1 जूनपासून 50 टॅरिफ लादणार; ट्रम्प यांची धमकी

EU सोबत कोणताही करार करू इच्छित नाही, 1 जूनपासून 50 टॅरिफ लादणार; ट्रम्प यांची धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियन देशांवर 50 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही धमकी दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले आहेत की, “युरोपियन युनियनमधून येणाऱ्या सर्व उत्पादनांवर 50 टक्के टॅरिफ लादला जाईल, जोपर्यंत ही उत्पादने अमेरिकेत तयार केली जात नाहीत.”

डोनाल्ड ट्रम्प युरोपियन युनियन देशांवर 1 जून रोजी हा कर लागू करण्याची योजना आखत आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, युरोपियन युनियनसोबत व्यापार करार पुढे न जाण्यामुळे ट्रम्प नाराज आहेत. युरोपियन युनियनने परस्पर संमतीने सर्व आयात शुल्क शून्यावर आणण्याचा प्रस्ताव दिला आहे, तर ट्रम्प सर्व आयातीवर 10 टक्के आयात शुल्क लादण्यावर ठाम आहेत. ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, त्यांना युरोपियन युनियनसोबत कोणताही करार करायचा नाही. जर कंपन्यांनी अमेरिकेत गुंतवणूक केली तर ते टॅरिफ टाळू शकतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जयपूरमध्ये म्हैसूरपाक मधील पाक शब्द हटवला जयपूरमध्ये म्हैसूरपाक मधील पाक शब्द हटवला
जयपूरमध्ये मिठाईच्या दुकानातील काही गोड पदार्थांची नावे बदलण्यात आली आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असल्याने याचा निषेध म्हणून जयपूरमधील...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 25 मे 2025 ते शनिवार 31 मे 2025
रानमेवा – काळी काळी मैना… डोंगरची मैना
रोखठोक – छत्रपती शिवरायांचा प्रसाद; श्री सप्तकोटेश्वराकडे चला!
अर्थभान – सूचीबाह्य शेअर्सच्या दुनियेत
डिजिटल अरेस्टची भीती घालून अमेरिकन नागरिकांची पुण्यातून लाखोंची लूट; आरोपी गुजरात, राजस्थानचे
हगवणे कुटुंबीयांचे बँकेतील लॉकर सील, बाळाच्या हेळसांडप्रकरणी नीलेश चव्हाणवर गुन्हा