काय सांगता, फक्त 11 रुपयांत विमान तिकीट! व्हिएतजेट विमान कंपनीची बंपर ऑफर

काय सांगता, फक्त 11 रुपयांत विमान तिकीट! व्हिएतजेट विमान कंपनीची बंपर ऑफर

व्हिएतनाम एअरलाईन विमान कंपनी व्हिएतजेटने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर आणली आहे. हिंदुस्थानमधील कोणत्याही शहरातून थेट व्हिएतनामला जाण्यासाठी एकेरी मार्गाचे इकॉनॉमी क्लासचे तिकीट केवळ 11 रुपये ठेवले आहे. (टॅक्स आणि शुल्क वेगळे असणार आहे.) या ऑफरअंतर्गत 3 जून 2025 पर्यंत बुकिंग करता येणार आहे. या ऑफरमध्ये मिळणाऱ्या तिकिटाची बुकिंग व्हिएतजेटची अधिकृत वेबसाईट www.vietjetair.com आणि मोबाईल अॅपद्वारे करता येऊ शकते, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या ऑफरअंतर्गत तिकीट बुक करणाऱ्यांसाठी काही नियम आहेत. हे प्रोमोशनल तिकीट सार्वजनिक सुट्ट्या आणि पिक ट्रॅव्हल पीरियडला सोडून 1 जुलै 2025 ते 28 मार्च 2026 पर्यंत वैध असणार आहे. 2026 च्या सुरुवातीला व्हिएतनामचा दौरा करणाऱ्यांसाठी किंवा सुट्टीत फिरायला जाणाऱ्यांसाठी ही ऑफर खास असणार आहे. हिंदुस्थान आणि व्हिएतनाम या दोन देशांमध्ये व्हिएतजेट आठवड्याला एकूण 78 फ्लाइट्स चालवते. या फ्लाईट्स दिल्ली, मुंबई, अहमदाबाद,हैदराबाद, बंगळुरू व कोच्ची येथून थेट व्हिएतनामच्या हनोई, हो ची मिन्ह सिटी, दा नांगसारख्या दक्षिण पूर्व आशिया येथील विमानतळावर पोहोचते.

हिंदुस्थानी प्रवासी व्हिएतनामद्वारा बाली, जकार्ता, बीजिंग, शांघाय, ग्वांग झोऊ किंवा ऑस्ट्रेलिया, जपान व दक्षिण कोरियाच्या प्रमुख शहरात स्वस्तातील तिकिटात प्रवास करू शकतील. व्हिएतजेट विमान कंपनीच्या स्वस्त तिकिटामुळे हिंदुस्थानातील पर्यटकांना व्हिएतनाममधील डा नांग, न्हा ट्रांग आणि फु क्वो कसारख्या समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेता येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या तीन फळांचा ज्यूस चुकूनही पिऊ नका, आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडेल या तीन फळांचा ज्यूस चुकूनही पिऊ नका, आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडेल
आपण अनेकदा म्हणतो की फळांचा ज्यूस पिणे खूप फायदेशीर असते. पण हे 90 टक्के लोकांना माहित नसेल की असेही काही...
झोपताना ही 5 लक्षणे दिसली तर ब्रेन ट्यूमर असू शकतो, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या
चुटकीसरशी हवंय स्वच्छ घर? वापरून बघा हे घरगुती क्लिनिंग सोल्यूशन्स!
फफूंदी, किडींपासून गव्हाचे संरक्षण करण्यासाठी आजमवा हे पारंपरिक उपाय…
अंडरआर्म्समध्ये तुरटी लावल्याने काय होते? जाणून थक्क व्हालं
Photo – रिंकू सिंहला ‘क्लीन बोल्ड’ करणाऱ्या खासदार प्रिया सरोज यांना सारखरपुड्यात अश्रू अनावर
किल्ले रायगडावर उद्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा, स्वराज्याच्या राजधानीत शिवभक्तीचा जागर