आश्चर्य! ऑनलाइन शॉपिंगमध्ये चंदिगड चमकले; दिल्ली, मुंबई, बंगळुरूला टाकले मागे

आश्चर्य! ऑनलाइन शॉपिंगमध्ये चंदिगड चमकले; दिल्ली, मुंबई, बंगळुरूला टाकले मागे

डिजिटलच्या जमान्यात आता देशभरात ऑनलाइन शॉपिंग केली जाते. देशात सर्वात जास्त ऑनलाइन शॉपिंग कुठल्या शहरात केली जाते तर मुंबई आणि दिल्ली हे शहरे अनेकांच्या डोळय़ांसमोर येतील, परंतु खरी परिस्थिती वेगळी आहे. चंदिगडने मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूसारख्या टॉपच्या शहरांना मागे टाकून ऑनलाइन शॉपिंगमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या मॉडय़ुलर सर्व्हेनुसार, चंदिगडमधील 69 टक्के कुटुंबे हे नियमितपणे ऑनलाइन खरेदी करत आहेत, तर दिल्लीत केवळ 48.3 टक्के आणि मुंबईत 63 टक्के कुटुंबे ही नियमित ऑनलाइन खरेदी करत आहेत. चंदिगडमधील उच्च मध्यम वर्गीय लोकसंख्या आणि तुलनेने जास्त प्रति व्यक्ती उत्पन्न यामुळे ऑनलाइन खरेदीला चालना मिळाल्याचे बोलले जात आहे. चंदिगडप्रमाणेच गोव्यात 51.6 टक्के दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे 50.6 टक्के ऑनलाइन खरेदी केली आहे. मध्य प्रदेशात 17.9, उत्तर प्रदेशात 18.9, पश्चिम बंगालमध्ये 20.8 टक्के ऑनलाइन खरेदी केली आहे.

प्रति व्यक्ती उत्पन्न जास्त

चंदिगडमधील प्रति व्यक्ती उत्पन्न 3500 अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. यामुळे या ठिकाणी सर्वात जास्त ऑनलाइन खरेदी केली जात आहे. दिल्ली आणि मुंबई यांसारख्या महानगरांना ऑनलाइन खरेदीत मागे टाकणे ही चंदिगडसाठी मोठी गोष्ट आहे. दिल्लीत एकूण खरेदी (अन्न आणि गैर-अन्न एकत्रित) मध्ये 78.2 टक्के कुटुंबे ऑनलाइन खरेदी करतात, तर चंदिगडमध्ये हा आकडा 71.5 टक्के इतका आहे. चंदिगडमधील ऑनलाइन खरेदीत कपडे, फॅशन ऍक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक्स आणि किराणा सामानाला सर्वाधिक मागणी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;