डहाणूच्या ऐना आरोग्य केंद्रातील साहित्य चोरुन भंगारात विकले; फक्त 20 रुपये किलो, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची मिलीभगत

डहाणूच्या ऐना आरोग्य केंद्रातील साहित्य चोरुन भंगारात विकले; फक्त 20 रुपये किलो, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची मिलीभगत

राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची अक्षरशः लक्तरे निघत आहेत. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डहाणू तालुक्यात तर आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. येथील ऐना आरोग्य केंद्रातील साहित्यच चोरून भंगारात विकल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून त्यात पलंग, कपाटे, खुर्च्य व एसीचा समावेश आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या मिलीभगतमुळे हा घोटाळा झाला असून फक्त 20 रुपये किलो याप्रमाणे आरोग्य केंद्रातील साहित्य भंगारात विकण्यात आले आहे. दरम्यान या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी डहाणूवासीयांनी केली आहे.

डहाणू तालुक्यातील ऐना प्राथमिक आरोग्य केंद्र हे महत्त्वाचे असून परिसरातील असंख्य रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. पण पुरेशी आरोग्य व्यवस्था व साधने नसल्याने रुग्णांची हेळसांड होते. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे या केंद्रात असलेले साहित्यच चोरी छुपके भंगारात नेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारी मालमत्तेची ही लूट असून त्यात डॉक्टर व काही कर्मचारी यांचाही समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोणाचीही परवानगी न घेता ऐना आरोग्य केंद्रातील साहित्य भंगारात विकण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांना दिला कुणी, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

  • ऐना प्राथमिक आरोग्य केंद्रातील किमती साहित्य भंगारात नेण्यात असल्याचे समजताच समाजसेवकांनी धाव घेऊन संपूर्ण प्रकाराचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे.
  • टेम्पोमध्ये कपाट, फ्रीज, एसी व अन्य साहित्य भरले जात असताना समाजसेवकांनी संबंधितांना जाब विचारला. तसेच गटविकास अधिकाऱ्यांशीदेखील संपर्क साधण्यात आला.
  • या घटनेची तत्काळ दखल अधिकाऱ्यांनी घेतली असून भंगारात नेलेले संपूर्ण साहित्य परत प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भात अद्यापि कोणावरही कारवाई झालेली नाही.

…तर भीक मागो आंदोलन करू
सरकारी दवाखान्यातील सामान भंगारात विकण्याची वेळ येत असेल तर ती अतिशय गंभीर बाब आहे. ही लुटमारी त्वरित थांबवा, अन्यथा आम्ही भीक मागो आंदोलन करू, असा इशारा मार्क्सवादी-लेनिनवादी लालबावटा पक्षाचे कार्यकर्ते कॉम्रेड प्रदीप सपाटे, गणेश सपाटे, शेरू वाघ आदींनी दिला आहे.

त्वरित कारवाई करा !
स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य यंत्रणेचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्षाचे राज्य सचिव अॅड. आदेश बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. ऐना आरोग्य केंद्रातील साहित्य बेकायदेशीरपणे भंगारात नेणे हा गुन्हा असून दोषींवर त्वरित कारवाई करा, अशी मागणी बनसोडे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;