कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतोय 5 कोटी, 21 जूनपासून नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’

कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतोय 5 कोटी, 21 जूनपासून नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’

कॉमेडी किंग कपिल शर्मा ओटीटीवरील सर्वात महागडा कॉमेडियन ठरला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा तिसरा सीझन 21 जून 2025 पासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. याच्या प्रत्येक एपिसोडसाठी कपिल शर्मा 5 कोटी रुपये फी आकारणार आहे. ही फी केवळ कॉमेडी शोसाठी नव्हे तर टीव्ही इतिहासात सर्वात जास्त मानली जात आहे. या शोची शूटिंग सुरू झाली आहे. या पहिला एपिसोड 21 जूनला नेटफ्लिक्सवर दिसणार आहे. द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोवर, किकू शारदा, अर्चना पूरन सिंह आणि अन्य काही चेहरे पुन्हा परतण्याची शक्यता आहे. कपिल शर्माचे दोन्ही सीझन जबरदस्त हिट ठरलेले आहे. आता पहिल्यांदा नेटफ्लिक्सवर येणार आहे. यामुळे कपिलच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या शोमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करत आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबात परत आलो आहे, असे वाटत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर काम करणे थोडे वेगळे आहे. परंतु, या ठिकाणी स्वातंत्र्य आणि क्रिएटिव्हिटी जास्त आहे, असे कपिल म्हणाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;