चीनकडून अमेरिकेला दिलासा, हिंदुस्थानची कोंडी; दुर्मिळ खनिजासाठी ऑटो सेक्टरची धावाधाव

चीनकडून अमेरिकेला दिलासा, हिंदुस्थानची कोंडी; दुर्मिळ खनिजासाठी ऑटो सेक्टरची धावाधाव

कार, ड्रोन, रोबोट, मिसाईल आणि अन्य काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी ज्या खनिजांची आवश्यकता लागते त्या खनिजांची 90 टक्के निर्यात चीनकडून केली जाते. परंतु चीनने गेल्या काही महिन्यात या खनिजांची निर्यात थांबवली आहे. त्यामुळे युरोप, अमेरिकेसह हिंदुस्थानातील ऑटो सेक्टरमध्ये कमालीची चिंता व्यक्त केली जात होती. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अमेरिकेला लागणारे आवश्यक खनिजे पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेने चीनसह संपूर्ण जगावर टॅरिफ बॉम्ब फोडल्यानंतर याला प्रत्युत्तर म्हणून चीनने या खनिजांच्या निर्यातीवर कंट्रोल आणला होता. याचा फटका अमेरिका आणि हिंदुस्थानसह अनेक देशांना बसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकाराने प्रश्न विचारला की, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग खनिजे निर्यात करण्यासाठी सहमत झाले आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, हो, त्यांनी सहमती दर्शवली आहे, परंतु वॉशिंग्टन येथील चिनी दूतावासाने यावर अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. ट्रम्प यांचे हे विधान शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बाहेर आले आहे. चीनने अमेरिकेतील तीन ऑटोमोबाईल कंपन्यांना या खनिजांची निर्यात करण्यासाठी परवाने दिले आहेत. यासंबंधीची पुढील चर्चा लंडनमध्ये होणार असून सोमवारी अमेरिकन अधिकारी चीनच्या अधिकाऱयांना भेटणार आहेत. ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानुसार अमेरिका-चीन यांच्यात 12 मे रोजी जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे एक समझोता करार झाला होता. या करारांतर्गत एक दुसऱयावर लावलेल्या टॅरिफला 90 दिवसांसाठी परत घेण्याची तयारी दर्शवली होती, परंतु चीनने एप्रिलमध्ये अनेक महत्त्वाच्या खनिजाला आणि चुम्बकाच्या निर्यातीला निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे ऑटोमोबाईल कंपन्या, कॉम्प्युटर चिप निर्मात्यांना आणि जगभरातील छोटय़ा-मोठय़ा कंपन्यांना आवश्यक सामानांची गरज भासू लागली होती.

हिंदुस्थान मंजुरीच्या प्रतीक्षेत

या चुंबक तत्वाचा वापर आयफोन, इलेक्ट्रॉनिक वाहन, एफ-35 यासारख्या लढाऊ विमानासाठी आणि मिसाईल सिस्टमसाठी केला जातो. चीनच्या निर्णयामुळे हिंदुस्थानातील ऑटो कंपन्यांना याचा जोरदार फटका बसत आहे. त्यामुळे ऑटो कंपोनेंट बनवणाऱया नऊ हिंदुस्थानी कंपन्यांनी चीनच्या दुतावासाकडे आयातीसाठी अर्ज मंजूर केले आहेत. तरीही सप्लाय सुरू करण्यात आले नाही. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने आतापर्यंत याला मंजुरी दिली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;