…तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी तडजोडीस नकार, दिला धमकीवजा इशारा

…तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी तडजोडीस नकार, दिला धमकीवजा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक, टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क यांच्यातील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी मस्क यांच्याशी संबंध संपल्याचे म्हटले. एवढेच नाही तर त्यांनी मस्क यांना धमकीवजा इशाराही दिला.

एलॉन मस्क यांनी येत्या निवडणुकीमध्ये डेमोक्रॅट्सला मदत करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. यावरून ते मस्क यांच्यासोबत कोणतीही तडजोड करण्यास तयार नसल्याचे स्पष्ट होते.

पुतीन यांनी मस्क यांना देऊ केला राजकीय आश्रय, ट्रम्प यांना रशिया कोंडीत पकडणार

ट्रम्प सरकारने ‘वन बिग ब्युटिफूल बील’ केल्यानंतर दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. हा पैशाचा अपव्यय असल्याचे म्हणत मस्क यांनी विशेष सल्लागार पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर टीकाही केली. सुरुवातीला मौन असणारे डोनाल्ड ट्रम्प यांनीही नंतर पलटवार केला. तसेच डेमोक्रेटिक उमेदवारांना मदत केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला.

मुलाखतीमध्ये ट्रम्प यांना मस्क यांच्याशी संबंध संपल्याचे वाटते का? असे विचारण्यात आले. याला उत्तर देताना ट्रम्प यांनी हो, मलाही तसेच वाटते असे म्हटले. मी इतर गोष्टींमध्ये खूप व्यग्र असल्याने माझा त्यांच्याशी (मस्क) बोलण्याचा कोणताही हेतू नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

दोस्त दोस्त ना रहा, व्यापार व्यापार ना रहा! डोनाल्ड ट्रम्प-एलॉन मस्क यांची दोस्ती तुटली, महाभियोग आणा… जेडी वॉन्स यांना राष्ट्राध्यक्ष करा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;