अरे बापरे… मगरीचे पिल्लू घरात शिरले; महाडमधील घटना

अरे बापरे… मगरीचे पिल्लू घरात शिरले; महाडमधील घटना

भक्ष्याच्या शोधात महाड तालुक्यातील राजेवाडी गावात आलेल्या मगरीच्या पिल्लाने चक्क एका घरात शिरकाव केला. अनाहूतपणे आलेल्या या पाहुण्याच्या आवाजाने सर्वांचाच थरकाप उडाला. वनविभागाने घटनास्थळी जाऊन मोठ्या शिताफीने मगरीच्या पिल्लाला पकडून सावित्री नदीत सोडले. त्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.

सायंकाळी पाचच्या सुमारास कशाचा तरी आवाज येत होता. फैसल आलेकर यांनी घरात पाहिले असता त्यांना सुमारे तीन फुटांचे मगरीचे पिल्लू दिसले. त्यामुळे त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. आलेकर यांनी प्रसंगावधान राखून घराचा दरवाजा बंद केला. मगरीचे पिल्लू घरात घुसल्याचे समजताच सर्वांनी बाहेर धूम ठोकली. घरातील सर्व दरवाजे बंद करून त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली.

गाळ उपसण्याचे काम सुरू
अवघ्या दहा मिनिटांतच वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन मगरीच्या पिल्लाला पकडून पुन्हा सावित्री नदीत सोडले. सावित्री पात्रात गाळ उपसण्याचे काम सुरू असल्यामुळे हे पिल्लू नागरी वस्तीत आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;