French Open Final 2025 – पॅरिसची नवी राणी, अमेरिकेच्या कोको गॉफने जिंकले महिला एकेरीचे विजेतेपद

French Open Final 2025 – पॅरिसची नवी राणी, अमेरिकेच्या कोको गॉफने जिंकले महिला एकेरीचे विजेतेपद

अमेरिकेची द्वितीय मानांकित टेनिसपटू कोको गॉफ हिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. निर्णयाक लढतीमध्ये तिने बेलारूसच्या अव्वल मानांकित अरिना सबालेन्काला हिचा 6-7(5), 6-2, 6-4 असा पराभव केला. तीन वर्षांपूर्वी तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, मात्र यंदा तिने आपल्या खेळात सुधारणा करत थेट जेतेपदाला गवसणी घातली. तिचे हे दुसरे ग्रँड स्लॅम आहे. याआधी तिने 2023 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेवर नाव कोरले होते.

अंतिम लढतीमध्ये बेलारूसची अरिना सबालेन्काला हिचे पारडे थोडे जड होते. तिने सुरुवातही चांगली केली. कोकोवर पहिल्या सेटमध्ये प्रचंड दबाव दिसला. यामुळे तिच्याकडून काही चुकाही झाल्या. याचा फायदा उठवत सबालेन्काला हिने पहिला सेट आपल्या नावावर केला.

दुसऱ्या सेटमध्ये मात्र 21 वर्षीय कोको गॉफ हिने दमदार पुनरागमन करत सबालेन्काला हिची सर्व्हिस ब्रेक केली. त्यानंतर सेबालेन्काला हिने एकामागोमाग एक चुका केल्या आणि याचा फायदा उठवत कोकोने दुसरा सेट 6-2 असा जिंकत लढत 1-1 अशी बरोबरीत आणली. त्यानंतर तिसरा सेटही जिंकत कोकोना विजेतेपदावर मोहोर उमटवली. हा सामना 2 तास 38 मिनिटे रंगला.

विजेतेपद मिळवल्यानंतर कोको गॉफ म्हणाली की, ही स्पर्धा जिंकू शकेन असे मला वाटत नव्हते. या यशाचे श्रेय माझ्या सहकाऱ्यांचे असून त्याने मला माझा सर्वोत्तम खेळ खेळण्यास प्रोत्साहित केले. कुटुंबियांचा विश्वासही मोलाचा ठरला. तीन वर्षांपूर्वी इथेच माझा पराभव झाला होता, यावेळी मी त्यावर मात करू शकले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;