टेस्लाचा रोबोट घरगुती कामात ’एक नंबर’, जेवण बनवताना आणि घर स्वच्छ करताना पाहून अनेकांकडून काैतुक
अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचा ह्युमनॉइड रोबोट ऑप्टिम्सला आता नवीन ओळख मिळाली आहे. हा रोबोर्ट केवळ चालणे आणि डान्स करत नाही तर घरगुती कामात मदत करण्यासाठी सर्वात पुढे असतो. ऑप्टिमस रोबोट अवघ्या काही मिनिटात घरातील साफसफाई करतो. जेवण बनवतो आणि व्हॅक्युम क्लिनिंग करतो, यासंबंधीचा एक व्हिडीओ नुकताच एलॉन मस्क यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून हा रोबोट आतापर्यंतचा सर्वात मोठे प्रोडक्ट आहे, असे म्हटले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला लाखो युजर्संनी पाहिले आहे. ऑप्टिमस रोबोट आता घरात एक मदतनीस म्हणून ओळखला जात आहे. रोबोटमुळे रोजच्या आयुष्यातील घरातील कामे करणे आणखी सोपे झाले आहे. ऑप्टिमस रोबोटला केवळ लोकांचे मनोरंजन करण्यासाठी नाही तर लोकांचे आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी आणले आहे, असे मस्क यांनी म्हटले आहे. मस्क यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत स्पष्टपणे दिसतेय की, ऑप्टिमस रोबोट घरात झाडू मारत आहे. जेवण बनवत आहे. घरातील कचरा डब्यात टाकत आहे.
- हा रोबोट वेगवेगळय़ा भाषेच्या कमांडवर आपले कार्य करतो. तसेच इंटरनेट व्हिडीओ पाहून सुद्धा कार्य करतो. ज्याप्रमाणे काही लोक युटय़ूबवर पाहून जेवण बनवतात. त्याप्रमाणे युटय़ूबवर पाहून हा रोबोट जेवण बनवू शकतो.
- नव्या गोष्टी शिकतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या रोबोटची चर्चा होत आहे. रोबोट जेवण बनवत आहे. तसेच घरातील सर्व कामे करत आहे, हे पाहून अनेक युजर्संनी या रोबोटचे काैतुक केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List