तैवान ओपन अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा – ज्योती याराजीला ऐतिहासिक सुवर्णपदक, 100 मीटर अडथळा शर्यतीत मारली बाजी

तैवान ओपन अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा – ज्योती याराजीला ऐतिहासिक सुवर्णपदक, 100 मीटर अडथळा शर्यतीत मारली बाजी

हिंदुस्थानची स्टार खेळाडू ज्योती याराजी हिने तैवान ओपन अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविला. तिने ही शर्यत सर्वात कमी वेळेत जिंकण्याचा पराक्रम केला. या स्पर्धेत हिंदुस्थानचे सहावे पदक होय.

आशियाई चॅम्पियन आणि राष्ट्रीय विक्रमवीरांगना ज्योती याराजी हिने 12.99 सेकंदात शर्यत पूर्ण करीत सोनेरी यश संपादन केले. जपानची असुका तेराडा 13.04 सेकंद वेळेसह रौप्यपदकाची मानकरी ठरली, तर तिचीच देशसहकारी चिसातो कियोयामा हिला 13.10 सेकंद वेळेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ज्योतीने २९ मे रोजी दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी तिने 12.96 सेकंद वेळेत शर्यत जिंकली होती. याचबरोबर राष्ट्रीय विक्रमवीर तेजस सिरसे याने पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत 13.52 सेकंद वेळेसह हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून दिले. यजमान तैवानच्या सियेह युआन केइ याने 13.72 सेकंद वेळेसह रौप्य, तर त्याचाच देशसहकारी कुइ रू चेन याने 13.75 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले.

रिलेतही हिंदुस्थानचे वर्चस्व

हिंदुस्थानने पुरुषांच्या 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत 38.75 सेकंद वेळ नोंदवित सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. गुरिंदरवीर सिंह, अनिमेष कुजूर, मणिकांता होबलीधर व अमलान बोरगोहेन या हिंदुस्थानी चौकडीने ही सोनेरी धाव पूर्ण केली. मात्र, या संघाला आपला 38.69 सेकंद वेळेचा राष्ट्रीय विक्रम मोडता आला नाही. याचबरोबर हिंदुस्थानच्या या रिले संघाला टोकियो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे तिकीट मिळविण्यातही अपयश आले. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी 14 देशांनी पात्रता मिळविली आहे. आता अखेरच्या दोन स्थानासाठी रस्सीखेच सुरू असून, सध्या नायजेरिया व नेदरलॅण्ड्स या देशांचे संघ 38.20 सेकंद वेळेसह या शर्यतीत आघाडीवर आहेत.

महिलांच्या 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत हिंदुस्थानी संघाने 44.06 सेकंद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. सुधीक्षा वदलुरी, स्नेहा सत्यनारायण, अबिनाया राजाराजन व नित्या गंधे या चौकडीने हे सोनेरी यश संपादन केले.

दुसरीकडे अब्दुला अबूबाकरने पुरुषांच्या तिहेरी उडीत, तर पूजा हिने महिलांच्या 1500 मीटर शर्यतीत हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून दिले. अबूबाकरने 16.21 मीटर उडी मारण्याची कामगिरी केली. मात्र, त्याची 17.19 मीटर ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होय. पूजाने 4 मिनिटे 11.63 सेकंद वेळेसह दीड हजार मीटर शर्यतीत बाजी मारली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;