मला माफ करा, मी आता सहन करू शकत नाही! ट्रम्प प्रशासनावर एलन मस्क यांची संतप्त प्रतिक्रिया

मला माफ करा, मी आता सहन करू शकत नाही! ट्रम्प प्रशासनावर एलन मस्क यांची संतप्त प्रतिक्रिया

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठिंबा दिलेल्या नवीन कर-खर्च विधेयकावर टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी जोरदार टीका केली आहे. मला माफ करा, मी आता सहन करू शकत नाही. काँग्रेसचे हे हास्यास्पद, घृणास्पद आणि महागडे विधेयक आहे. या विधेयकाचे समर्थन करणाऱया लोकांना स्वतःची लाज वाटली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया मस्क यांनी ‘एक्स’वरील पोस्टच्या माध्यमातून नोंदवली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेक्नोलॉजी क्षेत्रातील दिग्गज असलेल्या मस्क यांनी ट्रम्प प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ट्रम्प यांनी सिनेट रिपब्लिकनला विधेयक मंजूर करण्याचे आवाहन केले आहे. त्याचदरम्यान मस्क यांनी सोशल मीडियात टिप्पणी केली आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था आधीच डगमगलेली आहे. त्यातच देशाच्या अर्थव्यवस्थेची तूट 2.5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल. त्यामुळे अमेरिकेच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा आणखी वाढेल, असा इशाराही मस्क यांनी दिला आहे. त्यांनी सरकारसोबतच्या वादातून अलीकडेच गव्हर्नमेंट एफिशिएन्सी विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, या विभागावर संघीय खर्च कमी करण्याची जबाबदारी आहे. त्यापाठोपाठ त्यांनी स्वतःला नव्या वादग्रस्त विधेयकापासून दूर ठेवले आहे.

मस्क यांनी 2024 मध्ये ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी 250 दशलक्ष डॉलरहून अधिक डॉलरची आर्थिक मदत केली होती. त्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंट एफिशिएन्सी विभागाचे नेतृत्व स्वीकारले होते. आता तो विभाग बंद केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन घोषणा, 12 देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी

ट्रम्प प्रशासनाचे मस्क यांना प्रत्युत्तर

मस्क यांनी सोशल मीडियातून केलेल्या टीकेला ट्रम्प प्रशासनाने प्रत्युत्तर दिले आहे. नवीन विधेयकाबद्दल मस्क काय विचार करतात हे ट्रम्प यांना आधीच माहिती होते. मस्क यांनी केलेल्या टीकेमुळे ट्रम्प यांचे किंवा त्यांच्या प्रशासनाचे मत बदलणार नाही. हे मोठे विधेयक असून त्यावर ट्रम्प ठाम आहेत, असे व्हाइट हाउसच्या प्रेस सेव्रेटरी पॅरोलिन लेव्हिट यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;