सोलापूर पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, 3 प्रवाशांची प्रकृती गंभीर

सोलापूर पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, 3 प्रवाशांची प्रकृती गंभीर

सोलापूर पुणे महामार्गावरील आडेगाव ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. गुरुवारी पहाटे सोलापूर ते पुणे जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असून 3 ते 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

साई गणेश ट्रॅव्हल्स ची MH 48 K 1981 ही ट्रॅव्हल्स अहमदपूर (जिल्हा लातूर) ते पुणे अशी जात असताना पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच रात्रगस्तचे अधिकारी psi धापटे, हायवे पेट्रोलिंग चे अंमलदार Hc 862 पवार व pc 2145 इंगोले, अपघात पथकाचे Hc 1719 सरडे, पोलीस मित्र Hc 1886 कदम घटनास्थळी पोहोचले. यानंतर ट्रॅव्हल्स मधील सर्व प्रवासी यांना बाहेर काढण्यात आले.

जरम्यान अपघातात जखमी झालेल्यां प्रवाशांना टेंभुर्णी येथील मार्स हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 प्रवासी होते. त्यापैकी 3 प्रवासी गंभीर जखमी असून 17 ते 18 किरकोळ जखमी आहेत. अपघात होताच ट्रॅव्हल्सचा चालक घटनास्थळावरून पळून गेल्याचे समजले. त्यामुळे सध्या पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच पण ते कुटुंब बनवू शकतात! मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच पण ते कुटुंब बनवू शकतात! मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाही, पण याचा अर्थ समलिंगी लोक कुटुंब बनवू शकत नाहीत, असा होत नाही. समलिंगी लोक...
शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलच्या जागेत पालकमंत्री शिरसाट पुत्राची दारूची कंपनी! इम्तियाज जलील यांचा आरोप
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन
Bangalore Stampede – विराट कोहली विरोधात तक्रार दाखल, विजयाचा जल्लोष नडणार?
ट्रेन 90 मिनिटं लेट, मदत मिळालीच नाही; क्रिकेटरचा एक्स्प्रेसमध्ये दुर्दैवी मृत्यू
Ratnagiri Fort – घेरा यशवंत गडाच्या नवीन बांधकामाची पडझड, ग्रामस्थ संतापले; पुरातत्व विभागाकडून पाहणी
Ratnagiri News – रत्नागिरीत पोलिसांची धडक कारवाई; एकीकडे पाच बैलांची सुटका, दुसरीकडे गांजा जप्त