राज्यात पर्यावरणाची ऐशीची तैशी, आदित्य ठाकरे यांनी यादीच मांडली

राज्यात पर्यावरणाची ऐशीची तैशी, आदित्य ठाकरे यांनी यादीच मांडली

एकीककडे राज्यात पर्यावरणाची हानी होत आहे आणि सरकार पर्यावरणाबाबत किती जागरूक आहे हे दाखवण्यात मश्गूल आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच राज्यात पर्यावरणाची हानी कशी होत आहे याची यादीच आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, आज जागतिक पर्यावरण दिन आहे. हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपल्याला सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अनेक आमंत्रणही आली असतील. पण आज जे पर्यावरणसंबंधित जी संकट आपल्यासमोर उभी ठाकली आहेत, त्याबाबात सरकारला प्रश्न विचारण्याची कुणामध्ये हिंमत आहे का? पर्यावरण दिनानिमित्त सरकारकडून फक्त इव्हेंट होतात आणि हा फक्त भपका असतो.

मुंबईसाठी तयार करण्यात आलेला क्लायमेट अॅक्शन प्लॅन जवळपास केराच्या टोपलीत टाकण्यात आला आहे.
ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यानात खाणकामाला परवानगी देण्यात आली आहे.
लोखंडवाला तलाव अजूनही पाणथळ जागात समाविष्ट करण्यात आलेला नाही आणि दुसरीकडे मुंबईतल्या झाडांची कत्तल होत आहे.
धारावी पुर्नविकास प्रकल्पात माहीम नैसर्गिक उद्यानाचा समावेश करण्यात आला आहे. वेताळ टेकडी प्रकल्प अद्याप रद्द करण्यात आलेला नाही. अजनी वनावर अजूनही सरकारी बुलडोझरची टांगती तलवार कायम आहे. नदी विकास नावाने पुण्यातील पूरपरिस्थिती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरण बांधण्यासाठी तानसा वन्यप्राणी अभयारण्यातील पाच लाख झाडांच्या कत्तली होणार आहे.
उत्तर मुंबईत बनवण्यात येणाऱ्या पुलासाठी 9 हजार खारफुटींची झाडं तोडण्यात येणार आहेत तर याचा फटका 60 हजार खारफुटींच्या झाडांना बसणार आहे.
पर्यावरण बचावासाठी माझी वसुंधरा योजना मागे पडली आहे.
आणि हे सगळं सुरू असताना आपण पर्यावरणाबाबतीत किती जागरूक आहोत हे दाखवण्यात सरकार मश्गूल आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;