आनंद दिघे टॉवरवरील घड्याळाची टिक टिक बंद, धर्मवीर कुठे हरवले? पोस्टरबाजी करणाऱ्यांना ठाणेकरांचा सवाल

आनंद दिघे टॉवरवरील घड्याळाची टिक टिक बंद, धर्मवीर कुठे हरवले? पोस्टरबाजी करणाऱ्यांना ठाणेकरांचा सवाल

धर्मवीर आनंद दिघे यांचे आनंद आश्रम हडपल्यानंतर हाकेच्या अंतरावर असलेल्या आनंद दिघे टॉवरकडे मात्र दुर्लक्ष असल्याने मिंधे गटाचे बेगडी प्रेम दिसून आले आहे. या टॉवरवरील घड्याळाची टिक टिक बंद झाल्याने ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, दिर्धेच्या नावाने उभारलेल्या वास्तूची हेळसांड होत असून शिवसैनिकांच्या श्रद्धेची विटंबना होत असल्याने आमचे धर्मवीर कुठे हरवले? असा सवाल पोस्टरबाजी करणाऱ्यांना ठाणेकरांनी विचारला आहे.

ठाण्याच्या जांभळी नाक्यावरील आनंद दिघे टॉवरवरील घड्याळ कित्येक महिन्यांपासून बंद आहे. हा केवळ टॉवर नाही, हे केवळ एक घड्याळ नाही तर ठाणेकरांच्या भावना, श्रद्धा आणि दिर्धेच्या आठवणीचे जिवंत प्रतीक आहे. मात्र सत्तेचा मलिदा चाखणाऱ्या मिंध्यांकडून मात्र त्यांच्या नावाचा वापर करून राजकारण करत आहेत, पण प्रत्यक्षात त्यांच्या स्मृतींची, त्यांच्या नावाने उभारलेल्या टॉवरची स्थिती काय आहे, हे पाहायला कोण येत नसल्याची खंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केली.

पालिका प्रशासनाने आनंद दिघे टॉवर आणि घड्याळाची दुरुस्ती येत्या काही दिवसात केली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. ही मागणी केवळ एका घड्याळासाठी नाही तर धर्मवीराच्या स्मृतींच्या सन्मानासाठी आहे. त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष घालावे. रोहिदास मुंडे (कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;