फक्त निवडक उद्योगपतींचा फायदा नको, आकडेवारी दाखवत राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

फक्त निवडक उद्योगपतींचा फायदा नको, आकडेवारी दाखवत राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

दुचाकी, चारचाकी विक्रीत घट झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच फक्त निवडक उद्योगपतींचा फायदा असेलेली अर्थव्यवस्था आपल्याला नको असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, आकडे खरं बोलतात. दुचाकीची विक्री 17 टक्क्यांनी तर चारचाकींची विक्री 8.6 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर मोबाईल विक्री 7 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर दुसरीकडे खर्च आणि कर्ज दोन्ही वाढले आहेत. घराचं भाडं, घरखर्च, शिक्षणाचा खर्च जवळपास सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत.

तसेच ही फक्त आकडेवारी नाही तर त्या आर्थिक दबावाची सत्यता आहे ज्याच्याखाली प्रत्येक सामान्य माणूस पिचला जातोय. आम्हाला असे राजकारण हवे आहे ज्यात कुठल्याही प्रकारची इव्हेंटबाजी नको. ज्यात सर्मसामान्यांशी निगडीत प्रश्न हवेत, जिथे योग्य प्रश्न विचारले जातील, परिस्थती समजून घेतली जाईल आणि जबाबदारीने उत्तर दिले जाईल. आम्हाला अशी अर्थव्यवस्था नकोय ज्यात फक्त निवडक उद्योजकांचा फायदा होईल आम्हाला अशी अर्थव्यवस्था हवी आहे ज्याचा फायदा प्रत्येत भारतीयाला होईल असेही राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;